Devendra Fadnavis: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला भाजपकडून 5 लाख, भव्य सत्कार करणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Devendra Fadnavis: महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत जेतेपद मिळवणाऱ्या पृथ्वीराज पाटील याला भाजपने पाच लाखाचे बक्षिस जाहीर केलं आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज पाटील यांनी 25 वर्षानंतर मानाचा पुरस्कार मिळवून दिला.
कोल्हापूर: महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत जेतेपद मिळवणाऱ्या पृथ्वीराज पाटील (pruthviraj patil) याला भाजपने (bjp) पाच लाखाचे बक्षिस जाहीर केलं आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज पाटील यांनी 25 वर्षानंतर मानाचा पुरस्कार मिळवून दिला. त्यांचं अभिनंदन. कोल्हापूरच्या या पैलवानाचा भाजप सत्कार करेल. भाजपकडून त्यांना पुढील सरावासाठी 5 लाख रुपये देणार असल्याची घोषणा भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी फडणवीस कोल्हापुरात आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय प्रश्नांना उत्तरं देतानाच सत्ताधारी आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपचाच विजय होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
कोल्हापूर उत्तरची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. आम्हाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. उमेदवार सत्यजित कदम यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा मतदारसंघ हिंदुत्ववादी आहे. वर्षानुवर्ष या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यावेळी भाजप त्यांच्या सोबत होती. त्यामुळे भाजपच्या मतांची त्यांना मदत होत होती. त्यामुळे आमच्या विचाराला मानणारा हा मतदारसंघ आहे. काँग्रेस हा मतदारसंघ लढवत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहे. पण राजकारणात पॉलिटिकल अर्थमॅटिकल चालत नाही. पॉलिटिकल केमिस्ट्री चालते. मतदारांची पॉलिटिकल केमिस्ट्री बदलली आहे. शिवसेनेचा पाठिंबा आहे म्हणून काँग्रेसला मतदान करेल असं गणित लागणार नाही. पॉलिटिकल केमिस्ट्री भाजपच्या बाजूने आहे. ते उत्तर कोल्हापुरात पाहायला मिळतंय, असं फडणवीस म्हणाले.
आता अंबाबाईचा आशीर्वाद मिळेल
उत्तर कोल्हापुरात दहशतीचं वातावरण आहे. महाराष्ट्र आहे की बंगाल असा प्रश्न निर्माण होतोय. पण मला विश्वास आहे. दहशतीला झुगारून लोक मोठ्या प्रमाणात काम करतील. भाजपलाच लोकांचं मतदान मिळेल. राज्याची परिस्थिती पाहिली तर सत्ता पक्षाबद्दल महाविकास आघाडीबद्दल लोकात संताप आहे. भ्रष्टाचार आणि दुराचार होताना पाहायला मिळतोय. त्याची स्वाभाविक मनात चीड आहे. जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. हे सरकार स्वत:च्या पलिकडे पाहू शकत नाही, या निवडणुकीत भाजपचे 107वे भाजपचे आमदार म्हणून कदम निवडून येतील. सोलापूरात पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला. आता आई अंबाबाईचा आशीर्वाद निश्चित मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या:
Devendra Fadnavis: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे का?; फडणवीस काय म्हणाले?
Maharashtra News Live Update : सत्ताधारी दहशत परवण्याचे काम करीत आहेत – देवेंद्र फडणवीस