लाडकी बहीण योजना किती दिवस सुरु राहणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महिलांना खूशखबर

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेला उत्सफुर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. राज्यभरात महिला या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत. आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता देखील जमा झाला आहे.

लाडकी बहीण योजना किती दिवस सुरु राहणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महिलांना खूशखबर
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महिलांना खूशखबर
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 5:32 PM

महायुतीचा नाशिकमध्ये कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांना खूशखबर दिली. राज्य सरकारकडून अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. याच योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना उद्देशून महत्त्वाची माहिती दिली. लाडकी बहीण योजना किती दिवस सुरु राहणार याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

“आपण लाडकी बहीण योजना जेव्हा घोषित केली तेव्हा विरोधक म्हणायचे, फसवी योजना आहे. 10 टक्के महिलांनाही पैसे मिळणार नाही. मला सांगताना आनंद होतोय, पहिल्यात महिन्यात 1 कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पैसे पोहोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार, एकही बहीण वंचित राहू देणार नाही. सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणार. दर महिन्याला आणि वर्षानुवर्षे महिलांच्या बँक खात्यात पैसे जाणार. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत ही योजना कुणीच बंद करु शकत नाही”, अशी महत्त्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

‘विरोधकांच्या पोटात गोळा उठलाय’

“आमच्या विरोधकांच्या पोटात इतका गोळा उठलाय. ते म्हणतात, 1500 रुपये देवून तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का, महिलांना लाच देता का? अरे वेड्यांनो बहिणीचं आणि आईचं प्रेम कुणीच खरेदी करु शकला नाही. प्रत्यक्ष इश्वरदेखील उतरला आणि म्हटलं बहिणीचं प्रेम खरेदी करतो, पण ते खरेदी करता येत नाही. हे अनमोल प्रेम आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आमच्या बहिणींचं प्रेम मिळतंच, आमचा प्रयत्न आहे, त्या बहिणींना आम्ही ओवाळणी द्यावी तरी त्या प्रेमामध्येच राहायचं आहे. जे लोकं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना 1500 रुपयांचा मोल समजणार नाही. माझी जी मायमाऊली महिन्याचा हिशोब करताकरता तिच्या डोळ्यांतून पाणी येते त्या मायमाऊलीसाठी ही योजना आणली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.