साहित्य संमेलन वादात भुजबळांची शिष्टाई, भाजप नेत्यांची नाराजी दूर; फडणवीस लावणार हजेरी

साहित्य संमेलनाच्या निमंत्रणाबाबत भाजप नेते आणि महापौरांची नाराजी दूर केली आहे, असे संमेलनाध्यक्ष छगन भुजबळ यांच्याकडून कळवण्यात आले आहे.

साहित्य संमेलन वादात भुजबळांची शिष्टाई, भाजप नेत्यांची नाराजी दूर; फडणवीस लावणार हजेरी
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचा लोगो.
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 5:55 PM

नाशिकः साहित्य संमेलनाच्या निमंत्रणाबाबत भाजप नेते आणि महापौरांची नाराजी दूर केली आहे, असे संमेलनाध्यक्ष छगन भुजबळ यांच्याकडून कळवण्यात आले आहे. ही मंडळी संमेलनात हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, खरेच महापौर आणि भाजप नेते संमेलनात सहभागी होतात का, हे शुक्रवारीच पाहायला मिळेल.

का होती नाराजी?

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. समारोप शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः मंत्री छगन भुजबळ आहेत. शिवाय संमेलनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे हजेरी लावणार आहेत. साहित्य संमेलनात आघाडीच्या नेत्यांचा राबता राहणार आहे. मात्र, केंद्रीय मंत्री भारती पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साधे संमेलनाचे निमंत्रणही देण्यात आले नाही. संमेलनासाठी निधी देणाऱ्या भाजपच्या तिन्ही आमदारांचा निमंत्रण पत्रिकेत साधा उल्लेखही नाही. महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. महापालिकेनेही संमेलनासाठी 25 लाखांचा घसघशीत निधी दिली आहे. त्यानंतरही भाजप नेत्यांना डावलल्याने महापौर सतीश कुलकर्णी नाराज झाले होते. त्यांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.

भुजबळांनी घेतली सूत्रे हाती

महापौरांना सोमवारी निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी निमंत्रण पत्रिका दिला. यावेळी त्यांच्यासोबत संजय करंजकरही होते. पत्रिका पाहताचा महापौरांनी निमंत्रकांना खडेबोल सुनावले. भाजपच्या आमदारांपासून आम्ही महापालिकेने निधी दिला. मात्र, तुम्ही आमच्या पक्षाचे कुणाचेही नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकले नाही. केंद्रीयमंत्री, विरोधी पक्षनेत्यालाही निमंत्रण दिले नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर निमंत्रक जातेगावकर यांनी महापौरांची सपशेल माफी मागितल्याचे समजते. त्यानंतरही महापौर नाराज होते. अखेर छगन भुजबळांनी सूत्रे हाती घेत शिष्टाई केली. त्यामुळे हा राजकीय रुसवा फुगवा शमला आहे.

महापौर करणार स्वागत

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनास नाशिक महानगरपालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात आहे. निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नाशिकचे साहित्य संमेलन हे आपणा सर्वांचे साहित्य संमेलन असून, सर्वांच्या सहभागाशिवाय हे संमेलन यशस्वी होणार नाही. त्यामुळे नाशिककर म्हणून संमेलन यशस्वी करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तसेच महापौर म्हणून संमेलनासाठी येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचे स्वागत करावे लागणार आहे. त्यामुळे आपण या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांना केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असल्याचे भुजबळांना सांगितले आहे, तर महापौर सतीश कुलकर्णी यांनीही कार्यक्रमात सहभागी राहणार असल्याचे सांगितले आहे, असे छगन भुजबळांकडून कळवण्यात आले आहे. मात्र, याबाबत महापौर सतीश कुलकर्णी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तो होऊ शकला नाही.

इतर बातम्याः

फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले, विनायक मेटेंचा हल्लाबोल

नाशिक जिल्ह्यात 5 नगरपंचायतींची निवडणूक रंगणार; उद्यापासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या 442 रुग्णांवर उपचार सुरू; निफाड 95, सिन्नरमध्ये 74 बाधित

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.