मोठी बातमी : करुणा शर्मांच्या तक्रारीवर धनंजय मुंडेंचा खुलासा

धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांच्या आरोपांवर खुलासा केला आहे (Dhananjay Munde on Karuna Sharma Allegations).

मोठी बातमी : करुणा शर्मांच्या तक्रारीवर धनंजय मुंडेंचा खुलासा
धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 9:29 PM

बीड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होतं त्या करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधात तक्रार केल्याची माहिती आज समोर आलीय. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट (Chitrakut) बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप केला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांवर वृत्त प्रक्षेपित झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे (Dhananjay Munde on Karuna Sharma Allegations).

धनंजय मुंडे खुलाश्यात नेमकं काय म्हणाले?

आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो. श्रीमती करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी पूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमूद केले आहे. सदर याचिकेत उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांना मना आदेशही दिला आहे. )

त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्च न्यायालयाने मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणून नियुक्तीसुद्धा केली आहे.

सदर मेडिएशनच्या दोन बैठक झालेल्या असून 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत आणि निर्णयार्थ आहेत.

असे असताना आणि सहमतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे.

मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधीपक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसून निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतू दिसुन येतोय

कृपया सदर बाब ही न्यायप्रविष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही.

कृपया ही वस्तुस्थिती आणि न्यायालयीन प्रकरण आणि एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन वृत्त देताना सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती.

नेमकं प्रकरण काय?

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आता आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होतं त्या करुणा शर्मा यांनीच आता एकदा तक्रार केली आहे. यापूर्वी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी तक्रार केली होती. मात्र त्यांनी ती तक्रार मागे घेतली होती (Dhananjay Munde on Karuna Sharma Allegations).

यानंतर आता धनंजय मुंडे यांनी ज्या महिलेबाबत आपण सहमतीने संबंधात होतो, त्या करुणा शर्मा यांनी मौन सोडलं आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट (Chitrakut) बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

करुणा शर्मा यांनी असाही आरोप केला आहे की त्यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले जात नाही. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे सबंध असून त्यातून त्यांना दोन मुले झाल्याचं याआधी मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्य केलं होतं. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची करुणा शर्मा यांची मागणी आहे.

करुणा शर्मा यांचे आरोप काय?

करुणा शर्मा यांची गंभीर तक्रार आहे. करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट (Chitrakut) बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 यापूर्वी रेणू शर्मांची तक्रार

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. रेणू शर्मा यांच्या आरोपांनुसार 2006 पासून आपल्यावर अत्याचार सुरु आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. या तक्रारीबाबत समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे

धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी एक फेसबूक पोस्ट लिहून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला आहे. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचं मान्य केलं आहे. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं त्यांनी कबूल केलेलं नाही.

रेणू शर्माची तक्रार मागे 

दरम्यान, 22 जानेवारीला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी धनजंय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं होतं.

या प्रकरणातील कोर्ट ऑर्डर :

संबंधित बातम्या :

अखेर रेणू शर्मांची बहीण करुणा यांनीही मौन सोडलं, धनंजय मुंडेंविरोधात गंभीर तक्रार

करुणा शर्माबाबत धनंजय मुंडेंचा खुलासा, पण कोण आहेत करुणा शर्मा?

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण? 

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.