धाराशिव लेणी : उस्मानाबाद जिल्ह्याला लाभलेला अनोखा ऐतिहासिक ठेवा

उस्मानाबाद जिल्ह्याला एक अनोखा आणि सुंदर ऐतिहासिक ठेवा लाभलेला आहे. हा ठेवा म्हणजे धाराशिव लेणी. अजिंठा आणि वेरुळ लेणीप्रमाणे या लेणीला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळालेली नसली तरी अजिंठा इछल्या महायान लेण्यांच्या समकालीन या लेण्या असल्याचं सांगितलं जातं.

धाराशिव लेणी : उस्मानाबाद जिल्ह्याला लाभलेला अनोखा ऐतिहासिक ठेवा
धाराशिव लेणी
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 7:28 AM

उस्मानाबाद : तुळजापूरची तुळजाभवानी, नळदूर्गचा किल्ला, उस्मानाबादी शेळी आणि दुष्काळी जिल्हा अशीच काहीशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला एक अनोखा आणि सुंदर ऐतिहासिक ठेवा लाभलेला आहे. हा ठेवा म्हणजे धाराशिव लेणी. अजिंठा आणि वेरुळ लेणीप्रमाणे या लेणीला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळालेली नसली तरी अजिंठा इछल्या महायान लेण्यांच्या समकालीन या लेण्या असल्याचं सांगितलं जातं. (Dharashiv Caves, a unique historical place in Osmanabad district)

उस्मानाबाद शहराच्या ईशान्येला सहा किलोमीटर अंतरावरील एका टेकडीवर सात लेण्यांचा एक समुह आहे. त्यालाच धाराशिव लेणी म्हणून ओळखलं जातं. यातील सहा लेणी जैन लेणी मानली जातात. धाराशिव लेणी समूग टेकडीच्या दोन बाजूंवर आहेत. चार लेणी दरीच्या उत्तरेला असणाऱ्या टेकडीवर, तर उरलेली तीन लेणी त्या लगतच्या बाजूवर ईश्यानेला आहेत. धाराशिव लेण्याचा अभ्यास सर्वात आधी जेम्स बर्जेस याने 1875-76 मध्ये केला होता. प्राचिन लेण्यांच्या वास्तुशिल्पाच्या इतिहासात या लेण्यांचे मोठे महत्व आहे.

Dharashiv Leni

धाराशिव लेणी

धाराशिव लेण्यांचा इतिहास

या लेण्यांचा उल्लेख प्राचीन जैन साहित्यात येतो. इसवी सन 11 व्या शतकातील जैन मुनी कनकामर यांच्या करकण्डचरयु या प्राकृत ग्रंथाच्या चौथ्या आणि पाचव्या भागात तगर या गावाजवळ असलेल्या लेण्यांबद्दलचा उल्लेख आहे. या ग्रंथानुसार करकंड नावाच्या राजाचा मुक्काम तेरापुरच्या दक्षिणेस असलेल्या अरण्यात पडला होता. तेव्हा तेरापुरच्या शिव नावाच्या राजाने त्याची भेट घेऊन जवळच असलेल्या लेण्यांसंबंधी माहिती सांगितली. या लेण्यांमध्ये अनेक स्तंभ आहेत. त्यात पार्श्वनाथाच्या मूर्तीची करंडक राजाने पूजा केली. त्याचबरोबर या लेण्यांचा त्याने जीर्णोद्धार केला. तेथिल डोंगर माथ्यावर त्याला वारुळात असलेली एक पार्श्वनाथाची मूर्ती सापडली. ती आणून त्याने त्या मूर्तीची लेण्यात प्रतिष्ठापना केली. इतकंच नाही तर राजाने तेथे या लेण्याच्या वरील बाजूला अजून दोन लेणी खोदली.

Dharashiv Leni

धाराशिव लेणी

लेण्यांसंबंधीचे उल्लेख ‘करकण्डचरयु’ ग्रंथात

तरगपुराजवळच्या या लेण्यांची मुनी कनकामराने दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे. ज्या लेण्यांसंबंधीचे उल्लेख करकण्डचरयु ग्रंथात आलेले आहेत. ती लेणी तेर (प्राचीन तरगपूर) जवळ असलेल्या धाराशिव येथील लेणी असून पावसाळ्याच्या काळात हा परिसर अत्यंत रमणीय असा दिसतो. राज्य पुरातत्व विभागाने धाराशिव लेण्यांमध्ये केलेल्या साफसफाईच्या कामावेळी त्याच्या खालच्या बाजूला पायऱ्या असल्याचं दिसून आलं.

इतर बातम्या :

खूशखबर! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

अखेर भारताच्या Covaxin ला WHO ची मान्यता

Dharashiv Caves, a unique historical place in Osmanabad district

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.