भाजपमध्ये मोठी धुसफूस, पत्रकार परिषद घेत थेट राजीनामा, नेमकं काय घडलं?
भाजपमधील मोठी धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्रात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आागामी काळात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. असं असताना भाजपमध्ये पक्षांतर्गत दबावामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेत थेट राजीनामा दिला आहे.
धुळे | 14 डिसेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणूक असणार आहेत. या निवडणुका चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीत कार्यकर्ते खूश कसे असतील, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आनंदाने पक्षासाठी निवडणुकीसाठी कामकाज कसे पाहतील याबाबत रणनीती प्रत्येक पक्षात आखली जात आहे. असं असाताना धुळ्यात भाजमधील मोठी धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पक्षांतर्गत दबावला बळी पळून भाजप धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी अखेर स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे जाहीर केलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळेस त्यांनी केलेल्या कामाची माहिती पत्रकारांना दिली. 14 महिन्यांच्या कार्यकाळामध्ये आपण चांगले काम केल्याचा दावा अश्विनी पाटील यांनी केला आहे. कमी वयाच्या आणि उच्च शिक्षित अध्यक्ष म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. मात्र पक्षांतर्गत राजीनामाचा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला.
सुभाष भामरे यांच्या गटाला धक्का
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याच पक्षाचे सदस्य हे त्यांच्या राजीनामासाठी आग्रही होते. अखेर पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे आपण स्वखुशीने राजीनामा देत असल्याचं अश्विनी पाटील यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे कुठेतरी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या गटाला धक्का बसला असून, आमदार जयकुमार रावल यांच्या गटाच्या पथ्यावर हा निर्णय पडणार असल्याचं दिसून येत आहे.