AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच शाब्दिक चकमक, मविआचं काय होणार?

संजय राऊत आतापर्यंत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या टार्गेटवर असायचे. पण आता महाविकास आघाडीतूनच राऊतांचा समाचार सुरु झालाय. अजित पवार आणि नाना पटोले यांच्यानंतर शरद पवारांनीही राऊतांना खडेबोल सुनावलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच शाब्दिक चकमक, मविआचं काय होणार?
| Updated on: May 09, 2023 | 11:59 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीच्याच सर्वेसर्वांनी, संजय राऊतांचा चांगलाच क्लास घेतला. ‘सामना’तून शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला होता. नवं नेतृत्व निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले, अशी राष्ट्रवादीच्याच नेत्यांना दुखावणारी टीका राऊतांनी केली. त्यावर पवारांनी राऊतांना राष्ट्रवादीतलं काही माहिती नाही आणि त्यांच्या लिहिण्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं पवार म्हणाले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून संजय राऊतांचं बोलणं असो की मग ‘सामना’तल्या संपादकीयमधून त्यांचं लिहिणं असो. त्यांना अजित पवारांनीही फटकारलंय. नाना पटोलेंनीही आणि आता शरद पवारांनीही राऊतांच्या लिहिण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलंय.

शरद पवार राऊतांवर बोलले. त्याचवेळी पत्रकारांनी त्यांना पृथ्वीराज चव्हाणांवरुन सवाल केला आणि पृथ्वीराज चव्हाणांचं काँग्रेसमध्ये स्थान काय? अशी जळजळीत पलटवार पवारांनी केला. पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांवर फार टीका केली नाही. पण नाना पटोलेंनी पृथ्वीराज चव्हाणांचं स्थान काँग्रेसमध्ये एक नंबरच आहे, असं उत्तर दिलं. पवारही एवढं टोकाचं का बोलले, तर चव्हाणांनी काही दिवसांआधी राष्ट्रवादीची भाजपसोबत चर्चा सुरु असल्याचं म्हटलं होतं.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“ते ठीक आहे. सध्या त्यांच्या पक्षात त्यांचं काय स्थान आहे ते ए आहेत का? बी आहेत का? सी आहेत का?, का डी आहेत?, ते पहिल्यांदा चेक करावं. आणि त्यांच्या पक्षातल्या कोणत्या तरी सहकाऱ्यांना विचारलं की, यांची कॅटेगरी कोणीत आहे? तर ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीर सांगणार नाहीत”, असा टोला शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

शरद पवार यांच्या टीकेला पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. “शरद पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना वडिलकीच्या नात्याने बोलायचा अधिकार आहे. बोलले तरी मला काही वाटत नाही. मी यापूर्वीही बरंच काही सहन केलेलं आहे”, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या. तर दुसरीकडे शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमधील नंबर वन नेते म्हणत उत्तर दिलं.

पटोले-वडेट्टीवार वाद

महाविकास आघाडीत राऊतांवरुन सुरु झालेला विषय, पृथ्वीराज चव्हाण आणि त्यानंतर पटोले-वडेट्टीवारांमध्येच शाब्दिक चकमकीपर्यंत आला. आमच्याच नेत्यांनी जीभेवर संयम ठेवावा म्हणजे महाविकास आघाडी टीकेल असं वडेट्टीवार म्हणाले. त्यानंतर पटोलेंनी वडेट्टीवारांची उंचीच काढली. वडेट्टीवार एवढे मोठे नेते नाहीत असं पटोले म्हणालेत.

ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी…या महाविकास आघाडीचा सामना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेशी आहे. पण सध्या महाविकास आघाडीतले आणि पक्षापक्षातले नेते एकमेकांशी भिडतायत.

अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.