चहा दिला नाही म्हणून डॉक्टराने अर्धवट सोडली शस्त्रक्रिया

tea and doctor | चहाला पुणेकरांनी अमृततुल्याचा दर्जा दिला आहे. अनेकांना चहाची खूप तल्लफ असते. ठरविक वेळेस चहा हवा असतो. परंतु एखाद्या डॉक्टराने चहा मिळाला नाही, म्हणून शस्त्रक्रिया सोडली, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले. परंतु हा प्रकार नागपूरमध्येच घडला आहे. आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे.

चहा दिला नाही म्हणून डॉक्टराने अर्धवट सोडली शस्त्रक्रिया
नागपूर जिल्ह्यात खात आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया अर्धवट सोडून दिली. Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 10:05 AM

गजानन उमाटे, नागपूर | 7 नोव्हेंबर 2023 : मुसळधार पाऊस असो की हवेत गारठा असो अनेकांना अशा वातावरणात चहा हवा असतो. परंतु काही जणांना रणरणत्या उन्हातही चहाची तल्लफ येते. कधी झोप येत असेल तर कधी अभ्यासासाठी जागायचे म्हणून चहा घेतला जाता. यामुळे चहाचे स्टॉल गल्लीबोळात दिसतात. पुणेकरांनी चहाला अमृततुल्याची उपमा दिली आहे. पुण्यातील चहाच्या दुकानांना अमृततुल्य नाव दिलेले आहे. परंतु एका डॉक्टराने चहासाठी कमालच केली. या डॉक्टर महोदयांनी चहासाठी शस्त्रक्रिया अर्धवट सोडली. उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला. आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. डॉक्टराने केलेल्या या प्रकारामुळे रुग्णाचा जीव टांगनीला होता.

कोणी केला हा प्रकार

नागपूर जिल्ह्यातील हा प्रकार आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना भूलचे इंजेक्शन डॉक्टरांनी दिले. परंतु त्यानंतर त्यांना चहा मिळाला नाही. यामुळे डॉक्टर नाराज झाले. त्यांची ही नाराजी रुग्णासाठी तापदायक ठरली. कारण डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता पळ काढला. डॉ. भलावी असे संतापलेल्या डॉक्टरचे नाव आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा धक्कादायक प्रकार आहे. चहासाठी त्यांनी शस्त्रक्रिया सोडल्याचा हा प्रकार वरिष्ठांना कळाला.

हे सुद्धा वाचा

चौकशी समिती गठीत

डॉ. भलावी यांनी चहा दिला नाही शस्त्रक्रिया अर्ध्यावरच सोडून दिली. यामुळे ऑपरेशनसाठी भूल दिलेल्या चार महिलांना ताटकळत राहावं लागलं. हा प्रकार वरिष्ठांकडे गेल्यानंतर तातडीने दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली. जिल्हा परिषदेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्रिसदस्य समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. डॉक्टर रुग्णासाठी २४ तास उपलब्ध असतात. अत्यवस्थ रुग्णावर रात्रीअपरात्री डॉक्टर उपचार करतात. परंतु डॉ.भलावी यांनी केलेल्या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. डॉक्टरावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.