शिक्षण आयुक्तांचा लेटर बाँब, 72 अधिकाऱ्यांची चौकशी करा, एसीबीला दिले पत्र
नाशिकमध्ये शिक्षणाधिकारी सुनीता धनगर लाच प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहाराची चर्चा होऊ लागली आहे. यामुळे राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या चौकशी करण्यासंदर्भातील पत्र एसीबीला दिले आहे.
नाशिक, पुणे : नाशिकमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नुकतीच मोठी कारवाई केली. त्यामध्ये नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजाराची तर लिपिकाला ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. यात तब्बल ८५ लाख रुपये रोख रक्कम आणि ३२ तोळे सोनं अशी मालमत्ता आढळली आहे. तसेच धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा प्रकार समोर आला. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी लेटर बाँब टाकला आहे. त्यांनी राज्यातील ७२ अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी केली आहे, त्यात ३६ शिक्षणाधिकारी आहेत.
काय आहे पत्र
आयुक्तांच्या मागणीमुळे शिक्षण विभागातील बाजारीकरण चव्हाट्यावर, काय केली मागणी? शिक्षण विभागातील 72 अधिकाऱ्यांची खुली चौकशी करा, खुद्द शिक्षण आयुक्तांची मागणी केली आहे. यासंदर्भात राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी अँटी करप्शन ब्युरोला पत्र दिले आहे. पत्रात केली 72 अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराबाबत स्वतः आयुक्तांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे कौतूक होत आहे. शिक्षण आयुक्तांच्या या मागणीमुळे शिक्षण विभागातील बाजारीकरण चव्हाट्यावर आले आहे. त्याचवेळी अनेकांचे धाबे दणाणले आहे. या चौकशीतून शिक्षण विभागातील मोठे गैर व्यवहार समोर येण्याची शक्यता आहे.
३६ शिक्षणाधिकारींचा समावेश
शिक्षण आयुक्तांनी केलेल्या पत्रात राज्यातील 36 शिक्षणाधिकाऱ्यांची एसीबी चौकशी करावी, असेही म्हटले आहे. आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी पत्रातून केली आहे. शिक्षण आयुक्तांच एसीबीला पत्र देत असल्याने शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता आहे.
धनगर यांच्यांकडे किती रक्कम
महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी संशयित सुनीता धनगर यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात संपत्तीचा आकडा जवळपास 1 कोटी 34 लाख रुपयांपर्यंत गेला आहे. २ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना सुनीता धनगर पकडल्या गेल्या होत्या. त्यांनी भ्रष्टाचारातून जमविलेल्या संपत्तीचा आकडा जवळपास 1 कोटी 34 लाख रुपयांपर्यंत गेला आहे. पोलिसांनी अधिक तपासासाठी न्यायालयाकडे धनगर यांची एका दिवसाची कोठडी वाढवून मागितली. न्यायालयाने ती मान्य केली.