खडसेंचा करिष्मा! निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार, 18 नगरसेवकांचा कुटुंबासह राष्ट्रवादीत प्रवेश

ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी हा पहिला मोठा धक्का मानला जात आहे.

खडसेंचा करिष्मा! निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार, 18 नगरसेवकांचा कुटुंबासह राष्ट्रवादीत प्रवेश
eknath khadse bhusawal
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 6:39 AM

जळगाव : जळगावात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा करिष्मा आता दिसू लागला आहे असंच म्हणावं लागणार आहे. कारण, त्यांच्या समर्थकांनी ‘भाजप’ला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा सिलसिला सुरू केला आहे. त्यामुळे ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी हा पहिला मोठा धक्का मानला जात आहे. भाजपला सोडचिठ्ठी देताच खडसेंनी आता आपली पॉवर दाखवण्यास सुरुवात केली आहे. (eknath Khadse 18 bjp corporators joined NCP with their families in bhusawal jalgaon)

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळमधील 18 विद्यमान नगरसेवक आणि 13 माजी नगरसेवक व कुटुंबियांनी जळगाव इथं राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे नेते आणि समर्थक उपस्थित होते.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत एकूण 31 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले मफलर घालून प्रवेश केलेल्यांचा सत्कारकेला. भाजपमधून जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ. भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे आणि अनेक माजी नगसेवक व आजी माजी नगरसेवकांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश आहे.

खरंतर, एकनाथ खडसेंनी शनिवारीच एका आयोजित मेळाव्यामध्ये भाजपला थेट इशारा दिला होता. यावेळी ”मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल. जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल”, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी दिला होता. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीनं एक मेळावा आयोजित केला होता, त्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते.

नाथाभाऊला कसे तुरुंगात टाकता येईल, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु मी आयुष्यभर कधीही दोन नंबरचे धंदे केले नाहीत. जिल्ह्यात कोणाकडून नोकरीसाठी किंवा भरतीसाठी एक रुपया घेतला नाही. असे असेल तर कुणी सांगावे, तोंडात शेण घालावे, असं म्हणत त्यांनी भाजपलाही खडे बोल सुनावले.

या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे: एकनाथ खडसे

दरम्यान, या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे, एकनाथ खडसे मुक्ताईनगरच्या संवाद यात्रेत गिरीश महाजन यांच्यावर भडकले होते. पाच वर्षांच्या कालखंडात गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना एकावेळेसही नाथाभाऊंचा मतदारसंघ असल्यामुळे मुक्ताईनगरला फिरकले नाहीत. अरे हा दुष्काळी तालुका आहे. सिंचनाचा प्रश्न आहे. एक रुपया त्यांनी दिला नाही. मुक्ताईनगर अनेक सिंचनाचे प्रश्न तेव्हापासून रखडलेले आहेत. गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून जामनेरमध्ये सिंचनाची कामे झाली नाहीत, त्या ठिकाणी जी कामे झाली असतील ते एकनाथ खडसे यांच्यामुळे झाली आहेत, अशीही टीका यावेळी एकनाथ खडसे यांनी केली. (eknath Khadse 18 bjp corporators joined NCP with their families in bhusawal jalgaon)

संबंधित बातम्या – 

LIVE : नाथाभाऊंचा दणका, भुसावळमध्ये भाजपला मोठा धक्का, 18 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

धनंजय मुंडे प्रकरणात भाजप तोंडघशी पडलं, या प्रकरणातही चौकशीत सत्य बाहेर येईल : हसन मुश्रीफ

काँग्रेसचं अस्तित्व संपलं, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात

(eknath Khadse 18 bjp corporators joined NCP with their families in bhusawal jalgaon)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.