देवेंद्र फडणवीस ते शिवसेना, NCP; एकनाथ खडसेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
भाजपवर कोणताही रोष नसून मी मुख्यमंत्र्यांमुळे पक्ष सोडत आहे असं गंभीर वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं.
जळगाव : आज एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी प्रवेश करणार अशी अधिकृत घोषणा केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी आतापर्यंतची होणारी खदखद व्यक्त केली. भाजपवर कोणताही रोष नसून मी मुख्यमंत्र्यांमुळे पक्ष सोडत आहे असं गंभीर वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पाहूयात खडसे यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे…
खडसेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे…
– भाजप उपेक्षित होतं, अशा कालखंडापासून आजपर्यंत मी भाजपचं काम प्रामाणिकपणे केलं. भाजपबद्दल मला रोष नाही. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे त्यानंतर जे काही घडले ते महाराष्ट्राला माहिती आहे.
…तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेन, भाजप राजीनाम्यानंतर एकनाथ खडसेंचं मोठं विधान
– माझी अनेक वेळा चौकशी झाली. खोटे आरोप करण्यात आले. विनयभंगाचा आरोप केला. फडणवीसांनी स्वत गुन्हा नोंद करायला सांगितले.
– छळ किती करावा याला मर्यादा नव्हत्या तरी मी ते सहन केले. माझा दावा आहे, की माझं रेकॉर्ड काढा. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि शिवसेनेनेही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नाही. जर असं झालं असेल तर मी राजकारण सोडेन.
– मला चौकशीचा त्रास झाला. यापेक्षा मरणयातना चांगल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी मला नाईलाजांनी सांगितले, असे सांगितले.
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!
– फडणवीसांनी खालच्या स्तरावर राजकारण केलं
– मी जे काही मिळवलं ते माझ्या हिंमतीवर मिळवलं
– माझ्या अनेक चौकश्या झाल्या, भूखंड हडप करण्याचे आरोप झाले, माझ्यावर खोट्या विनयभंगाचा खटलादेखील दाखल करण्यात आला. उद्या उठून बलात्काराचाही गुन्हा दाखल केला असता.
– देवेंद्र फडणवीस स्वत: पोलीस स्टेशनला फोन केला आणि गुन्हा नोंद करायला सांगितलं.
“डेंजरपणे हिशेब चुकते करण्याची खडसेंची ख्याती, गिरीश महाजनांना थेट आव्हान”
– पक्ष सोडू नये म्हणून चंद्रकांत पाटलांशिवाय कुणाकडूनही मनधरणी नाही
– आयुष्यात मला काय मिळालं नाही मिळालं याचं दु:ख नाही. पण मनस्ताप झाला याचं जास्त दु:ख आहे. मी जे काही पद मिळवलं ते माझ्या ताकदीवर झालं.