भाजपमध्ये जाण्यासाठी शरद पवार यांना…एकनाथ खडसे काय बोलून गेले

माझे सरळ संबंध नड्डाजी यांच्याशी आहे. हे मी कधी लपवून ठेवलेलं नाही. पवार साहेबांना सुद्धा ते माहीत आहेत. माननीय शरद पवार साहेबांनी मला सहा वर्षांसाठी आमदारकी अशा काळात मिळवून दिली आहे. त्यावेळी अंधारात होतो. आजपर्यंत पवार साहेबांच्या सल्ल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट केलेली नाही.

भाजपमध्ये जाण्यासाठी शरद पवार यांना...एकनाथ खडसे काय बोलून गेले
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 7:53 AM

जळगाव | 13 मार्च 2024 : कधीकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार एकनाथ खडसे पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चांना अधिक जोर देणारे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. यावेळी त्यांनी आपले राजकीय विरोधक गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. आपण भाजपमध्ये जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा आधी शरद पवार यांना कळवेल. शरद पवार यांच्या संमतीने भाजपमध्ये जाईल, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर एकनाथ खडसे यांनी हे मोठे विधान केले. सध्या भाजपमध्ये जाण्याचं कुठलंही महत्वाचे कारण नाही आणि माझी इच्छा ही नाही, अशी पुष्टी त्यांनी त्यानंतर जोडली.

पवार साहेबांच्या सल्ल्याने जाईल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमधील घरवापसीच्या त्यांच्या सुरू असलेल्या चर्चेवर महत्वाचे वक्तव्य केले आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, मी लपून-छपून जाणार नाही. ज्यावेळी भाजपमध्ये जाईल तेव्हा उघडपणे जाईल. तसेच पवार साहेबांच्या सल्ल्याने जाईल, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले.

गिरीश महाजन यांना टोला

भाजपमध्ये जाण्याबाबत मला मंत्री गिरीश महाजन यांच्या परवानगीची गरज नाही. मी 40-42 वर्षांपासून भाजपमध्ये होतो. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यापेक्षा माझे वरिष्ठांची चांगले संबंध आहेत. ते आजही कायम आहेत. पक्षाच्या तत्त्वाशी मतभेद असू शकतात मात्र व्यक्ती म्हणून माझे कोणाशी मतभेद नाही. मोदीजी, नड्डाजी, राजनाथ सिंहजी यांना मी कधी भेटलो नाही, असेही नाही. रक्षा खडसे माझ्या घरात खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी माझा भेटीगाठी होत असतात ते स्वाभाविक आहे.

आता जमीनही जमा झालीय

भाजपमध्ये जाण्यासाठी पाच वर्षांची आमदारकी सोडून जाणे एवढं काही मोठे कारण आता नाही. ईडीचा विषय आता नाही. मला नोटीस आल्या माझ्या जमिनी जमा झाले आहे. त्यामुळे गेलो असतो तर तेव्हाच गेलो असतो, असे खडसे म्हणाले. सध्या माझी मनापासून भाजपमध्ये जाण्याची इच्छा नाही. जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी पवार साहेबांना कळवेल, असे खडसे यांनी म्हटले.

नड्डाजी यांच्याशी माझे संबंध

माझे सरळ संबंध नड्डाजी यांच्याशी आहे. हे मी कधी लपवून ठेवलेलं नाही. पवार साहेबांना सुद्धा ते माहीत आहेत. माननीय शरद पवार साहेबांनी मला सहा वर्षांसाठी आमदारकी अशा काळात मिळवून दिली आहे. त्यावेळी अंधारात होतो. आजपर्यंत पवार साहेबांच्या सल्ल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट केलेली नाही.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...