ज्यांनी पैसे भरले त्यांची वीज तात्काळ जोडून द्या, ऊर्जामंत्र्यांचे नवे आदेश काय? वाचा सविस्तर

ग्राम पंचायत पातळीवर बैठकी घेऊन "कृषी धोरण-2020"ची माहिती शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

ज्यांनी पैसे भरले त्यांची वीज तात्काळ जोडून द्या, ऊर्जामंत्र्यांचे नवे आदेश काय? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 6:01 PM

मुंबई : कृषी पंपाच्या वीज (Electricity bill) देयकाची थकबाकी भरण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शेतकरी मेळावे घ्या तसेच ग्राम पंचायत पातळीवर बैठकी घेऊन “कृषी धोरण-2020″ची माहिती शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच वीज जोडण्यासाठी पैसे भरूनही आजवर कृषी पंप जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने वीज जोडणी देण्याचे निर्देशही ऊर्जा मंत्र्यांनी दिले आहेत. रिसोड- मालेगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार अमित झनक यांच्या पुढाकाराने वाशीम जिल्ह्यातील वीज विषयक समस्यांचा आढावा ऊर्जामंत्री राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला.

बिल भरलेल्यांना तात्काळा वीज जोडून द्या

नितीन राऊत म्हणाले की, कृषी पंपाच्या थकबाकीसोबतच नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लवकर वीज जोडणी कशी मिळेल यासाठी अधिकारी वर्गाने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी जिल्हा पातळीवर कृती आराखडा करून त्याची धडक अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. तसेच महावितरणकडून विविध कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. जे कंत्राटदार कामे करण्यास हयगय करीत असतील अश्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश ऊर्जामंत्री यांनी महावितरणला दिले.

फेब्रुवारीपर्यंत वीज जोडणी पूर्ण करणार

वाशीम जिल्ह्यात सध्या उच्च दाब वितरण प्रणाली अंतर्गत 431 शेती पंपाच्या वीज पंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित आहे. पुढील महिन्यापर्यंत शिल्लक वीज जोडण्यापूर्ण करण्याचे उद्धिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. रिसोड आणि मालेगाव तालुक्यात वीज ग्राहकांना होत असलेल्या समस्येची माहिती महावितरणला असून या परिसरातील वीज ग्राहकांना खात्रीशीर वीज पुरवठा मिळावा यासाठी दोन्ही तालुक्यात 5 एमव्हिए क्षमतेचे दोन वीज उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत तसेच शिरपूर,जवळा येथे अतिरिक्त 5 एमव्हिए क्षमतेचे रोहित्र लावण्यात येणार आहे.

Goa Eelections 2022 : लढाई आधीच शस्त्र टाकले? राऊत म्हणतात, गोव्यात भलेही आम्ही सरकार बनवणार नाही पण..

ZP Election result 2022: काय आहे गोंदियाचं चाबी संघटन, ज्यांना शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्यात?

Nagar Panchayat Election result 2022 : ज्या मतदारसंघात पटोलेंनी मोदींना मारण्याची भाषा केली, तिथं काँग्रेस हरली की जिंकली?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.