एसटी महामंडळात चालले काय? कंडक्टरांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी, कारण… व्हिडिओ व्हायरल
st bus conductor: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील भोगावती बस स्टँड परिसरात कंडक्टरमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीची सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांबाबत लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
गाव तेथे एसटी असे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या राज्य परिवहन मंडळ कधीच नफ्यात आले नाही. त्यामुळे परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन कमी असते. त्यांचे वेतनही वेळेवर होत नाही. त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केले. त्यानंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनाची हमी घेतली. महाराष्ट्र सरकारने एसटीतून प्रवास करणाऱ्या महिनांना अर्धे तिकीट, ७० वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देण्याची योजना सुरु केली. या योजनांमुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. परंतु एसटी कंडक्टर अजूनही सौजन्याने वागत नसल्याची उदाहरणे अधूनमधून समोर येतात. आता कंडक्टरने दुसऱ्या कंडक्टरशी तुफान हाणामारी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील भोगावती बस स्टँड परिसरात कंडक्टरमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीची सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांबाबत लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. परिवहन महामंडळाकडून यासंदर्भात अजून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
काय झाला प्रकार
ब्रेक डाऊन झालेल्या एसटीमधील प्रवाशी दुसऱ्या एसटीमध्ये घेण्यावरून कंडक्टरमध्ये हाणामारी झाली. भोगावती बस स्टँड परिसरात एका बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे त्या बसमधील कंटक्टर दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना बसवण्याची विनंती करण्यासाठी गेला. परंतु त्या बसमधील कंडक्टर त्याला नकार देताना दिसत आहे. त्यानंतर बसच्या खाली उतरुन तो त्या कंडक्टरला मारहाण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. माराहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
भोगावती बस स्टँड परिसरात कंडक्टारमध्ये हाणामारी… pic.twitter.com/VzFpW6mYZv
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2025
त्या कंडक्टरवर अजून कारवाई नाही
परिवहन महामंडळाची बस कोणत्याही कारणावस्त खराब झाली तर त्या बसमधील प्रवाशांना कंडक्टर दुसऱ्या बसमध्ये बसवून देत असतो. त्यासंदर्भात परिवहन महामंडळाकडून सक्त आदेश सर्व कर्मचाऱ्यांना दिलेले आहे. त्यानंतर एका बसमधील कंडक्टर दुसऱ्या कंडक्टरला मारहाण करताना दिसत आहे. त्या कंडक्टरवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. परंतु अजून त्याच्यावर कारवाई झाल्याची कोणतीही माहिती नाही.