Sulli Deal : “सुल्ली डिल” प्रकरणात पहिली अटक, बंगळूरमधून तरुण ताब्यात

मुंबई पोलिसांनी "सुल्ली डिल" प्रकरणात बेंगळुरू येथून 21 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांचे सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. कालच नवाब मलिक यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तातडीने कारवाईची आदेश दिले होते, महिला आयोगही या प्रकरणावरून आक्रमक झाल्याचे दिसून आले.

Sulli Deal : सुल्ली डिल प्रकरणात पहिली अटक, बंगळूरमधून तरुण ताब्यात
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 10:51 PM

मुंबई पोलिसांनी “सुल्ली डिल” प्रकरणात बेंगळुरू येथून 21 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांचे सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. कालच नवाब मलिक यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तातडीने कारवाईची आदेश दिले होते, महिला आयोगही या प्रकरणावरून आक्रमक झाल्याचे दिसून आले.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटे अपलोड करुन त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. मलिक यांच्या माहितीनंतर राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या महिलांसंबंधीची माहिती वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरुन काढून टाकण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच महिलांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मदत करणाऱ्या ‘गिटहब’ या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

‘गिटहब’ विरुद्ध कारवाई करा महिला आयोगाची मागणी

“सुल्ली डील नावाच्या ॲप वरून मुस्लीम महिलांचे फोटो, फाईल व त्यासमोर त्यांची किंमत लिहून प्रसारित केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत; असे मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने दिसून येते. या सुल्ली डील ॲपवरून महिलांसंबंधीची माहिती विविध समाजमाध्यमांवरसुद्धा प्रसारित झाली आहे. त्यामुळे सर्व समाज माध्यमंवरून ती माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी. तसेच असे ॲप तयार करून संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’ विरुद्धसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाने महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत,” अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.

Buldhana Murder : भावाच्या मदतीसाठी आलेल्या युवकाचे अपहरण करुन मारहाण, चौघांना अटक

अनेक स्टेशनच्या नावामध्ये सेंट्रलचा वापर केला जातो, माहित आहे का यामागील कारण?

अजित पवार, नारायण राणे पुन्हा आमने-सामने; सरकार पडणार म्हणाऱ्यांमध्ये राणेंची भर, पवारांनी लगावला टोला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.