बहुचर्चित कथित धर्मांतरणासाठी परदेशातून फंडिंग; नाशिकच्या तरुणाच्या खात्यात तब्बल 20 कोटी जमा

सध्या गाजत असलेल्या कथित धर्मांतरण प्रकरणाची एकेक नवी माहिती समोर येत आहे. नाशिकच्या तरुणाच्या खात्यात धर्मांतरणासाठी चक्क 20 कोटी रुपये जमा झाले होते. विविध देशांतून ही रक्कम त्याला पाठवण्यात आल्याचे समजते.

बहुचर्चित कथित धर्मांतरणासाठी परदेशातून फंडिंग; नाशिकच्या तरुणाच्या खात्यात तब्बल 20 कोटी जमा
कथित धर्मांतर प्रकरणात नाशिकमधून कुणाल उर्फ आतिफला अटक.
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 12:36 PM

नाशिक : सध्या गाजत असलेल्या कथित धर्मांतरण प्रकरणाची एकेक नवी माहिती समोर येत आहे. नाशिकच्या तरुणाच्या खात्यात धर्मांतरणासाठी चक्क 20 कोटी रुपये जमा झाले होते. विविध देशांतून ही रक्कम त्याला पाठवण्यात आल्याचे समजते. (Funding from abroad for alleged conversions; 20 crore deposited in the account of Nashik youth)

उत्तर प्रदेशमधील कथित धर्मांतर प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने नाशिकरोडच्या आनंदनगर भागातून आतिफ उर्फ कुणाल नावाच्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. आतिफ हा कुणाल या नावाने नाशिक शहरात वास्तव्याला होता. उत्तर भारतातील कथित धर्मांतर प्रकरण गंभीर आहे. उत्तर प्रदेश मधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जवळपास 1 हजार लोकांना धर्मांतरित करण्यात आल्याचा आरोप होत असून, नागरिकांचं धर्मांतर करत असताना वेगळी थेअरी अवलंबण्यात आल्याचीही चर्चा रंगली होती. याप्रकरणी नाशिकच्या कुणाल अशोक चौधरी उर्फ आतिफसह मुजफ्फनगर (उत्तर प्रदेश) येथील मोहम्मद शरीफ कुरैशी व मोहम्मद इदरीलला दहशतवाद विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे कुणालच्या अटकेबाबत नाशिकच्या पोलिसांना काहीही माहिती नसल्याचे समजते.

कुवैतसह इतर देशांतून निधी गोळा

मात्र, या कुणाल उर्फ आतिफच्या खात्यात चक्क 20 कोटी रुपये जमा केले गेल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कथित धर्मांतर करण्यासाठी हा निधी गोळा केल्याचा आरोप होत आहे. कुवैतसह जगभरातल्या इतर देशांमधून कुणालच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली होती. आता हा निधी कोणाकोणाच्या खात्यातून पाठवण्यात आला आहे. त्यांची यादी तयार करून या व्यक्ती कोण आहेत, याची झाडाझडतीही घेण्यात येणार आहे. सोबतच हा निधी फक्त धर्मांतरणासाठी वापरायचा होती की, इतर काही कारवायांसाठी. याचा तपासही दहशतवादी विरोधी पथकाने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ट्रस्टच्या माध्यमातून फंडिंग

उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने देशाच्या वेगवेगळ्या भागातून जवळपास 12 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यातले अनेक जण वेगवेगळ्या विश्वस्थ संस्था म्हणजेच ट्रस्ट चालवायचे. या ट्रस्टसाठी जगभरातून फंडिंग सुरू होती. या निधीचा कथित धर्मांतरणासाठी वापर केला जात होता. यातला एक जण जसा नाशिकमध्ये नाव बदलून राहिला होता, तसेच इतरही अनेकजण आपली ओळख लपवून रहात असल्याचे समोर येत आहे. (Funding from abroad for alleged conversions; 20 crore deposited in the account of Nashik youth)

इतर बातम्याः

मरणानेही छळले होते! नाशिक जिल्ह्यात स्मशानभूमी नसल्याने ताडपत्री धरून तरुणावर अंत्यसंस्कार

नाशिकमध्ये चिकुन गुन्याचे थैमान; महिन्यापासून डेंग्यूचाही उद्रेक, स्वच्छता मोहीम राबवण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.