Ganpatrao Deshmukh : राज्याच्या राजकारणातील एक पर्वाचा अस्त, गणपतराव देशमुखांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा आढावा

महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू माणून म्हणून ओळख असलेले आबासाहेब अर्थात गणपतराव देशमुख यांचं आज सोलापूरमधील रुग्णालयात निधन झालं. शुक्रवारी रात्री 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

Ganpatrao Deshmukh : राज्याच्या राजकारणातील एक पर्वाचा अस्त, गणपतराव देशमुखांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा आढावा
माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 10:46 PM

मुंबई: राज्याच्या राजकारणातील मोठं नाव, शेतकरी कामगार पक्षाचं जेष्ठ नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू माणून म्हणून ओळख असलेले आबासाहेब अर्थात गणपतराव देशमुख यांचं आज सोलापूरमधील रुग्णालयात निधन झालं. शुक्रवारी रात्री 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गणपतराव देशमुख हे आपल्या सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व शेवटपर्यंत करत राहीले. शेकापच्या नेत्यांसह राज्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केलीय. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी आम्ही आणि मतदारसंघ आज पोरका झाल्याची भावना व्यक्त केली आहे. (Former MLA Ganapatrao Deshmukh passes away)

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघ हा सर्वात आगळावेगळा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. एक पक्ष, एक व्यक्ती, एक मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुखांमुळे या मतदारसंघाची ही ओळख निर्माण झाली होती.. गणपतराव देशमुख या मतदारसंघातून तब्बल 11 वेळा विजयी झाले होते. ते विधानसभेत तब्बल 50 वर्षे राहिले आहेत. राज्यातील विधानसभेत सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. या काळात मुख्यमंत्रीपदाची संधीही त्यांना चालून आली होती. काय होता हा किस्सा? या सर्वांचा घेतलेला हा आढावा.

साधा माणूस

गणपतराव देशमुख हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे सर्वाधिक लोकप्रिय होते. 11 वेळा आमदार राहूनही त्यांची राहणीमान अत्यंत साधी राहिली आहे. एसटी आणि रेल्वेने प्रवास करणारा आमदार म्हणूनही त्यांच्याबद्दल राज्यातील नागरिकांना नेहमीच कुतुहूल वाटायचे. त्यामुळेच त्यांच्या साधी राहणीमानाची नेहमीच चर्चा व्हायची. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणाऱ्या माणसाचा नेता अशी त्यांची ख्याती होती. सांगोला तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या संघर्षामुळेच सांगोल्याला उजनीचे पाणी मिळू शकले.

केवळ दोनदा पराभव

शेतकरी कामगार पक्ष राज्यात प्रभावहीन झाला आहे. तरीही देशमुख यांनी सांगोला मतदारसंघ राखला. या मतदारसंघातून ते तब्बल 11 वेळा निवडून आले. 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या देशमुखांना केवळ 1972 आणि 1995 मध्ये त्यांचा पराभव झाला. 1972 मध्ये काकाळासाहेब साळुंखे-पाटील यांनी त्यांचा पराभव केला. तर 1995मध्ये काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांनी त्यांना पराभूत केले. हे दोन पराभव वगळता देशमुख यांनी सातत्याने विजय मिळवला आहे. मात्र, प्रकृती आणि वय या दोन कारणामुळे 94 वर्षीय देशमुख यांनी 2019ची विधानसभा निवडणूक लढवली नाही.

अधिककाळ विरोधी बाकावर

गणपतराव देशमुख सर्वाधिक काळ विधानसभेत राहिले असले तरी बहुतेक काळ ते विरोधी पक्षातच होते. 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले. त्यावेळी देशमुखांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला. तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. हा अपवाद वगळता ते नेहमी विरोधी पक्षातच राहिले.

तर मुख्यमंत्री झाले असते…

पुण्याच्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूची 5वी युवा संसद जानेवारी 2020मध्ये पार पडली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. 1999मध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार असा पेच निर्माण झाला. कारण आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार अशी चर्चा सुरू होती. पण बहुमत नसल्याने आमदार आपल्यासोबत येणार नाहीत, हेही दिसत होते. त्यावेळी शेकापचे तीन आमदार निवडून आले होते. तेव्हा गोपीनाथ मुंडेही मुख्यमंत्री नको आणि नारायण राणेही मुख्यमंत्री नको… गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा… असा विचार आला. त्यावर सर्व सहमतही होते. पण नंतर ते झालं नाही, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला होता.

कोण होते गणपतराव देशमुख?

>> गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला होता. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पिंपरी येथे झाला. त्यांचं मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर प्रभुत्व होतं. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय राहिला. 1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. त्यानंतर 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांना भरभरुन मतांनी विजयी केलं. विशेष म्हणजे 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता.

>> महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार म्हणूनही गणपतराव देशमुख यांची ओळख राहिली. त्यांचे सध्या वय 95 होते. सलग अकरा वेळा निवडून विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रमाचीही देशमुख यांच्या नावे नोंद आहे.

>> गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

इतर बातम्या :

Pune Corona Update : पुणे जिल्ह्यात कोरोना डोकं वर काढतोय! जुन्नर आणि इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

आता शेतकरी मोबाईल ॲपद्वारे करू शकणार पिकांची नोंदणी, 7/12 नंतर फेरफार ऑनलाइन करण्याचा निर्णय

Former MLA Ganapatrao Deshmukh passes away

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.