AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NashikGold: पाडव्यादिवशी महागाईचा गोडवा; सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या!

ऐन दिवाळीत नाशिकमध्ये सोन्याची झेप महागाईकडे सुरू असून शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार रुपये नोंदवले गेले.

NashikGold: पाडव्यादिवशी महागाईचा गोडवा; सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या!
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 12:57 PM
Share

नाशिकः ऐन दिवाळीत नाशिकमध्ये सोन्याची झेप महागाईकडे सुरू असून शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 400 रुपये नोंदवले गेले, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली.

नाशिकच्या सराफा बाजारात वसुबारसेच्या दिवशी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48000 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46500 रुपये नोंदवले, तर चांदीचे दर किलोमागे 65000 रुपये नोंदवले गेले. धनत्रयोदशी दिवशी मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46 हजार 900 रुपये आणि चांदीचे दर किलोमागे 65 हजार 500 रुपये नोंदवले गेले. बुधवारी सोन्याचे भाव जवळपास 700 रुपयांनी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47 हजार 500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46 हजार 300 रुपये नोंदवले गेले. चांदीमध्ये जवळपास दोन हजारांनी घसरण झाली. किलोमागे चांदीचे दर 63 हजार 500 रुपये नोंदवले गेले. गुरुवारीही सोने-चांदी स्वस्त होते. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47 हजार 500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार रुपये नोंदवले गेले, चांदीचे दर किलोमागे 64000 रुपये नोंदवले गेले. शुक्रवारी या दरात वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48000 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 400 तर चांदीचे दर किलोमागे 67000 रुपये नोंदवले गेले, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली. शिवाय सायंकाळपर्यंत बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होईल, असा अंदाज त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केला.

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Gold and silver prices are expensive in Nashik bullion market)

इतर बातम्याः

‘कवच कुंडल’ विरुद्ध ‘हर घर दस्तक’; कोणती लसीकरण मोहीम राबवायची, राज्यातले आरोग्य कर्मचारी पेचात!

22 हजार कोटींच्या विमान प्रकल्पासाठी भुजबळांच्या पायघड्या; नाशिकमध्ये येण्याचे टाटांना आवतन!

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.