Nashik Gold| योगायोगाचे घबाड, सोने दीड अन् चांदी 4 हजारांनी स्वस्त, वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत गोड झाला!

वर्षातल्या शेवटच्या गुरुपुष्यामृत योगादिवशी आज सोन्याच्या दरात जवळपास दीड हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

Nashik Gold| योगायोगाचे घबाड, सोने दीड अन् चांदी 4 हजारांनी स्वस्त, वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत गोड झाला!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 3:15 PM

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजारात आज वर्षातल्या शेवटच्या गुरुपुष्यामृत योगादिवशी सोन्याच्या दरात जवळपास दीड हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 47900 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46300 रुपये नोंदवले गेले. मात्र, येणाऱ्या काळात सोने महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर आलेला दसरा, दिवाळी सणात बाजारपेठेने कात टाकली. आता लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे सराफा बाजारपेठेत वर्दळ पाहायला मिळत आहे. 22 नोव्हेंबर रोजी नाशिकच्या सराफा बाजारपेठेत 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 49400 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 47950 नोंदवले गेले होते. चांदीचे दर किलोमागे 67800 रुपये होते. 24 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 47850 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 46300 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 65500 रुपये नोंदवले गेले. गुरुवारी 25 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 47900 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 46300 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 63500 रुपये नोंदवले गेले. सोन्याच्या दरामध्ये साधरणतः दीड हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली, तर चांदीचे दर किलो मागे 4 हजार रुपयांनी स्वस्त झालेली पाहायला मिळाली.

दिवसभर मुहूर्त

विशेष म्हणजे आज गुरुवारी वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे. सोन्या-चांदीचे दर कमी झाल्याने अनेकांनी आज सोने खरेदी करायला प्राधान्य दिले. दिवसभर हा मुहूर्त आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात अजून वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत.

गुरुपुष्यामृत योगादिवशी अनेक जण आवर्जुन सोने खरेदी करतात. आज वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योगे आहे. सोने आणि चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. नाशिकच्या सराफा बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 47900 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46300 रुपये नोंदवले गेले. सोन्याच्या दरात जवळपास दीड हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

Nashik| मध्यरात्री 12 दरोडेखोरांचा हैदोस, घरमालक गंभीर; 6 लाखांचा ऐवज लंपास, एकाला पाठलाग करून बांधले

साहित्य संमेलनात वादाचा रतीब; गीतामध्ये शाहीर परदेशींच्या ऐवजी चक्क अज्ञाताचे छायाचित्र, अगाध ज्ञानाचे धक्क्यावर धक्के!

Nashik| ग्रीनफिल्ड महामार्ग वादाच्या भोवऱ्यात, 4 गावांचा विरोध, बागायती जमिनी जिरायती दाखवल्याचा आरोप

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.