Gold Price|ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना…भावात चक्क 600 रुपयांची घसरण, चांदीही 60 हजारांखाली!

सध्याच्या आठवड्यात सोन्याच्या दरात सुकाळ झाला असून, भावात तब्बल 600 रुपयांची घसरण पाहायला मिळतेय.

Gold Price|ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना...भावात चक्क 600 रुपयांची घसरण, चांदीही 60 हजारांखाली!
Gold
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 1:42 PM

नाशिकः सध्याच्या आठवड्यात सोन्याच्या दरात सुकाळ झाला असून, भावात तब्बल 600 रुपयांची घसरण पाहायला मिळतेय. नाशिकच्या सराफा बाजारात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47850, 22 कॅरेट सोने 10 ग्रॅममागे 46000, तर चांदी किलोमागे 63000 रुपये नोंदवली गेली. मात्र, या साऱ्या दरावर 3 टक्के जीएसटी वेगळा असेल. येणाऱ्या काळात लगीनसराई आहे. त्यावेळेस मात्र, सोन्याचा भाव वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेकजण आत्ताच सोन्याची खरेदी करून ठेवायला प्राधान्य देत आहेत.

पुण्यातही स्वस्त

पुण्याच्या सराफा बाजारातही गुरुवारी आणि शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. येथे 6 जानेवारी रोजी 49150 रुपयांच्या सोने दरांनी बाजार बंद झाला. शुक्रवारी या दरात 590 रुपयांची घसरण होत सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48560 रुपये नोंदवले गेले. चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी एक किलोमागे चांदीने 63700 रुपये भाव नोंदवत बाजार बंद झाला. मात्र, शुक्रवारी या दरात 1860 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

मुंबई, औरंगाबादचे दर 

औरंगाबादमध्ये शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे48,560 रुपये नोंदवले गेले. तर चांदीचे दर किलोमागे 61,840 रुपये नोंदवले गेले. नागपूरमध्येही शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे48,560 रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे दर किलोमागे 61,840 रुपये नोंदवले गेले. मुंबईतहे सोन्या-चांदीचे दर हेच होते.

चांदीतही पडझड

दुसरीकडे इंडिया बुलियन्स एसोसिएशनने जाहीर केलेल्या दरात चांदी 60 हजारांच्या खाली गेल्याचे म्हटले आहे. गुरुवारी चांदीचे दर 60435 रुपये प्रति किलो नोंदवले गेले. हे दर शुक्रवारी 59801 रुपये प्रति किलो असून कालच्या तुलनेत 634 रुपयांची घट झाल्याचे म्हटले आहे.

‘गुगल पे’वर सुविधा

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

नाशिकच्या सराफा बाजारात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47850, 22 कॅरेट सोने 10 ग्रॅममागे 46000 तर चांदी किलोमागे 63000 रुपये नोंदवली गेली. मात्र, या साऱ्या दरावर 3 टक्के जीएसटी वेगळा असेल. या आठवड्यात सोन्याच्या दरात साधारणतः 600 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळत आहे. -गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

Nashik Corona| नाशिकमधील शाळा सोमवारपासून बंद; कुठले वर्ग राहणार सुरू?

Nashik Omicron| सर्व यात्रांवर बंदी, लसीकरण न झाल्यास कटू निर्णय; मंत्री भुजबळांनी काय दिला इशारा?

Nashik Crime| 16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा; शासनालाही 51 कोटींचा चुना, नेमका घोटाळा काय?

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.