BREAKING | शिंदे-फडणवीस सरकारला आता तिसरं इंजिन लागणार? अब्दुल सत्तार यांचं सूचक विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दोन दिवसांपूर्वी मुंबईत दौरा झाला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा डबल इंजिन सरकार असा उल्लेख केला होता. पण राजकीय वर्तुळात सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे.

BREAKING | शिंदे-फडणवीस सरकारला आता तिसरं इंजिन लागणार? अब्दुल सत्तार यांचं सूचक विधान
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 10:07 PM

गोंदिया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेतील (Shiv Sena) अनेक आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी करुन भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केलं. त्यामुळे या सरकारला डबल इंजिन सरकार मानलं जातंय. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दोन दिवसांपूर्वी मुंबईत दौरा झाला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा डबल इंजिन सरकार असा उल्लेख केला होता. पण राजकीय वर्तुळात सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे. सध्याच्या डबल इंजिन सरकारला आता आणखी एक इंजिन जोडलं जाण्याची शक्यता असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना याबात प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. त्यामुळे राज्यातील डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिन होणार की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

“देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जो डब्बा जोडतील तोच डब्बा भविष्यात लागेल. महाराष्ट्रात सध्या शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वातील डबल इंजिन सरकार चालू आहे. शिंदे-फडणवीस ज्या इंजिनाबाबत निर्णय घेतील तेच इंजिन या डबल इंजिनला लागेल”, असं सूचक विधान अब्दुल सत्तार यांनी केलंय.

“अब्दूल सत्तार यांच्या सूचक विधानाने भविष्यात कदाचित ट्रिपल इंजिनचे सरकार होऊ शकते. पण या सरकारसोबत मनसे की राष्ट्रवादी काँग्रेस जाईल?”, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीवर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया

दरम्यान, ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडी यांच्या युतीची सध्या चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची उद्या संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी दोन्ही बडे नेते युतीची घोषणा करु शकतात. या विषयावरही अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली.

“महाराष्ट्रात कोणतीही युती झाली तरी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र राहणार आहे. महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर जुडले तरी भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र राहणार आहे”, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

“आम्ही अडीच वर्षाच्या कामांचा बॅकलॉग भरतोय आणि निधीच्या स्वरुपात पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या सरकारला भरपूर पाठिंबा देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोणीही युती केली तरी आम्ही एकत्र आहोत”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.