गोंदियात भर रस्त्यावर मारहाणीचा थरार, एसटी चालकाला प्रवाशांसमोर अमानुष मारहाण

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली. एसटी बस चालकावर प्रवाशांसमोरच बेदम मारहाण केली गेली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गोंदियात भर रस्त्यावर मारहाणीचा थरार, एसटी चालकाला प्रवाशांसमोर अमानुष मारहाण
गोंदियात भर रस्त्यावर मारहाणीचा थरार, एसटी चालकाला प्रवाशांसमोर अमानुष मारहाण
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 8:29 PM

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत अकोटोला-ब्राह्मणी मार्गावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्षुल्लक कारणावरून एसटी बस चालकाला प्रवाशांसमोरच आरोपींनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ही घटना 21 नोव्हेंबरला सकाळी 9.30 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. एसटी चालक घोटी रहिवासी मोहम्मद शाहिद मोहम्मद शफी शेख यांच्या फिर्यादीवरून, आरोपी विजेश चंपकलाल अग्रवाल (वय 30) आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध बीएनएस 2023 चे कलम 132, 121, (1) 3 (5) अन्वये गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गोंदिया आगारा बसचे चालक मोहम्मद साहिद मोहम्मद शफी शेख हे प्रवासी भरून गोंदिया येथून तिल्ली मोहगावकडे निघाले. ते मोहगाव येथे प्रवाशांना सोडून 40 प्रवाशांना घेऊन गोंदियाच्या दिशेने येत असताना आरोपी मागून एम 35 एझेड 0115 क्रमांकाच्या दुचाकीवरून येत होता. चंपकलाल अग्रवाल आणि पाठीमागे बसलेल्या एका व्यक्तीने जागा न देण्याच्या कारणावरून बससमोर मोटारसायकल उभी करून बस थांबवली.

हे सुद्धा वाचा

आरोपीने चालकाला शिवीगाळ करत त्याने बस चालकाला बसमधून खाली खेचले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. संबंधित व्हिडिओत आरोपी बस चालकाला मारहाण करत असून शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे. पीडित बसचालकाच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.