Job Vacancy : महाराष्ट्र मेट्रोमध्ये टेक्निशिअन, इंजिनिअरसह अनेक पदांवर भरती, 1.25 लाखांपर्यंत असेल पगार

मुंबई : Maharashtra Metro Jobs 2021 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (MMRC) मध्ये नोकऱ्यांची उत्तम संधी असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेक्निशिअन, इंजिनिअरसह अनेक महत्त्वाच्या पदांवर नोकर भरती होणार आहे. महाराष्ट्र मेट्रोकडून या भरतीसाठी ऑनलाईन अर्जही मागवण्यात आले आहेत. ज्यामध्ये विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रताही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार mahametro.org […]

Job Vacancy : महाराष्ट्र मेट्रोमध्ये टेक्निशिअन, इंजिनिअरसह अनेक पदांवर भरती, 1.25 लाखांपर्यंत असेल पगार
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 4:18 PM

मुंबई : Maharashtra Metro Jobs 2021 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (MMRC) मध्ये नोकऱ्यांची उत्तम संधी असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेक्निशिअन, इंजिनिअरसह अनेक महत्त्वाच्या पदांवर नोकर भरती होणार आहे. महाराष्ट्र मेट्रोकडून या भरतीसाठी ऑनलाईन अर्जही मागवण्यात आले आहेत. ज्यामध्ये विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रताही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार mahametro.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोकरीसाठी अर्ज करू शकता. तर 21 जानेवारी 2021 ही नोकरीसाठीच्या अर्जाची अंतिम तारीख असणार आहे. (government jobs 2021 mmrc maharashtra metro job vacancy pune rail project metro bharti online apply)

पुणे मेट्रो रेल प्रकल्प (Pune Metro Rail Project) : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून पुणे रेल्वे प्रकल्पांतर्गत अनेक पदांवर भरतीसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता निर्धारिक केल्या आहेत. ज्यामध्ये दहावी पास ते अनेक पदवीधरांना अर्ज भरण्याची संधी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेक्निशियन पदासाठी दहावी पास असलेले उमेदवार एनसीव्हीटी / एससीव्हीटी (NCVT/SCVT) मान्यताप्राप्त संस्थेकडून आयटीआय प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात. तर स्टेशन कंट्रोलर आणि कनिष्ठ अभियंता (Junior engineer) पदासाठी अर्ज करण्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी संबंधित तीन वर्षांचा डिप्लोमा पास असणं महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर, विभाग अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून बीई किंवा बीटेक पास असणं आवश्यक आहे.

काय आहे वयाची मर्यादा

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मध्ये टेक्निशिअन, इंजिनिअरसह सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे तरुण वर्गासाठी नोकरीची ही उत्तम संधी असणार आहे.

अर्जाची फी

या सर्व पदांवर अर्ज करण्यासाठी जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 400 रुपये फी भरावी लागणार आहेत. तर इतर श्रेणींसाठी 150 रुपये शुल्क निश्चित करण्यात आला आहे.

कसे होणार सिलेक्शन ?

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, या पदांसाठी अर्जदारांची सगळी कागदपत्रं असणं महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर अर्जदाराचा लेखी आणि तोडीं इंटव्ह्यूदेखील घेतला जाईल.

नोकरीसाठी कसं कराल अप्लाय?

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र मेट्रोच्या mahametro.org अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया 14 डिसेंबर 2020 पासून सुरू आहे. तर अर्जाची शेवटची तारिख 21 जानेवारी 2021 आहे. (government jobs 2021 mmrc maharashtra metro job vacancy pune rail project metro bharti online apply)

संबंधित बातम्या – 

चांगली बातमी! नव्या वर्षात ही कंपनी 9 हजार लोकांना नोकरी देणार; रोजगाराची सुवर्णसंधी

नव्या वर्षात Good News, आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार पदं भरणार

नव्या वर्षात रोजगाराची सुवर्णसंधी, ‘ही’ कंपनी देतेय 1100 इंजिनियर्सना नोकरी

(government jobs 2021 mmrc maharashtra metro job vacancy pune rail project metro bharti online apply)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.