AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी घटनेनुसार काम करतोय, कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही’, राज्यपालांचं प्रत्युत्तर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याआधी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून राज्यपालांवर जोरदार टीका केली होती

'मी घटनेनुसार काम करतोय, कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही', राज्यपालांचं प्रत्युत्तर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 5:21 PM
Share

नांदेड : राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावरून राजकारण पेटलेलं असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे. मी संविधानाने दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय आणि कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं राज्यपालांनी म्हटलं आहे. (Governor Bhagat Singh Koshyari has responded to the criticism made by the MVA government during his visit to Marathwada)

नवाब मलिकांची टीका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याआधी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून राज्यपालांवर जोरदार टीका केली होती. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांवर आक्षेप घेतला होता. राज्यपालांकडून राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. त्यावर आता राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले राज्यपाल?

राज्यपाल सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बैठक नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली, असं राज्यपाल म्हणालेत. मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय, असं राज्यपालांनी स्पष्ट केलं. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटलंय.

राज्यपालांचा नांदेड दौरा संपला, उद्या हिंगोलीला जाणार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा नांदेड जिल्ह्याचा दौरा आज संपला आहे. नियोजित दौरा आटोपून राज्यपाल मुक्कामासाठी रवाना झाले आहेत. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात राज्यपालांचा मुक्काम असेल. उद्या सकाळी 9 वाजता ते हिंगोलीसाठी रवाना होणार आहेत.

संबंधित बातम्या : 

राज्यपालांचा नांदेड दौरा व्यापाऱ्यांच्या मुळावर, बंदोबस्ताच्या नावाखाली दुकाने बंद करण्याचे आदेश

राजकीय धुराळ्यानंतर राज्यपालांचं एक पाऊल मागे, उद्घाटन टाळलं, साधी पाहणीही नाही!

राज्यपालांच्या दौऱ्यावरुन राष्ट्रवादी आक्रमक, बैठक रद्द न केल्यास काळे झेंडे दाखवण्याचा इशारा

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.