महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, चित्रा वाघ, मनीषा कांयदेंनी घेतली शपथ

विधीमंडळामध्ये उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडला. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली.

महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, चित्रा वाघ, मनीषा कांयदेंनी घेतली शपथ
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 1:11 PM

Governor Elected Quota Vidhan Parishad MLC : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीला अखेर आज मुहुर्त मिळाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी 12 आमदारांची नियुक्ती रखडली होती. अखेर आज राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली.

महाराष्ट्राच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी विधीमंडळात जोरदार तयारी करण्यात आली होती. उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. राज्यतील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती मोठी खेळी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली होती. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे.

महायुतीचा फॉर्म्युलाही निश्चित

राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी महायुतीचा फॉर्म्युलाही निश्चित करण्यात आला होता. यानुसार भाजप ३, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी २-२ जागा असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादीकडून इंद्रीस नायकवाडी, पंकज भुजबळ यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी देण्यात आली आहे. नुकताच या सात जणांनी आमदारकीची शपथ घेतली.

कोणी-कोणी घेतली शपथ?

या शपथविधी सोहळ्यापूर्वी सर्व आमदारांचे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्यासोबत फोटो सेशन पार पडले. यावेळी शिंदे गटाचे नेते माजी खासदार हेमंत पाटील यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज भुजबळ यांनी शपथ घेतली. यानंतर शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांनी शपथ घेतली. यानंतर सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर आणि अजित पवार गटाने नेते इद्रिस नायकवडी यांनी आमदारकीची शपथ घेतली. यानंतर भाजप नेते आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी शपथ घेतली. यानंतर वाशिममधील पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांचा राज्यपाल नियुक्त आमदारपदी शपथविधी सोहळा पार पडला.

राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे

चित्रा वाघ (भाजप) विक्रांत पाटील (भाजप) बाबूसिंग महाराज राठोड (भाजप) मनीषा कायंदे (शिंदे गट) हेमंत पाटील (शिंदे गट) पंकज भुजबळ (अजित पवार गट) इद्रिस नायकवडी (अजित पवार गट)

ठाकरे गटाचा आक्षेप

राज्यपाल नियुक्त सात आमदारांवर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. याविरुद्ध ठाकरे गटाकडून सकाळी साडेदहा वाजता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने अॅडव्होकेट सिद्धार्थ मेहता सकाळी साडेदहा वाजता याचिका दाखल करणार आहेत.

उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा.
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत.
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ.
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ.
भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं
भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं.
'हे म्हातारं काही थांबणार नाही...' पवारांची भरसभेत विरोधकांवर टोलेबाजी
'हे म्हातारं काही थांबणार नाही...' पवारांची भरसभेत विरोधकांवर टोलेबाजी.
सिद्दिकी पितापुत्रांना एकत्रच मारण्याचा प्लॅन, आरोपींची मोठी कबुली
सिद्दिकी पितापुत्रांना एकत्रच मारण्याचा प्लॅन, आरोपींची मोठी कबुली.
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 'या' 7 नावांची यादी तयार
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 'या' 7 नावांची यादी तयार.
महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजणार, निवडणूक आयोग आज घोषणा करणार
महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजणार, निवडणूक आयोग आज घोषणा करणार.
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.