राज्यपाल कोश्यारींचे मुलींबद्दलचे वक्तव्य संघाच्या मनुवादी विचारसरणीतून : अतुल लोंढे

राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेताना लोंढे पुढे म्हणाले की, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. परंतु संघाच्या शिक्षणामुळे महिलांबाबतची संघाची मतंच त्यांच्या बोलण्यातून बाहेर आली. महिलांबद्दल संघाची मतं सर्वश्रुत आहेत.

राज्यपाल कोश्यारींचे मुलींबद्दलचे वक्तव्य संघाच्या मनुवादी विचारसरणीतून : अतुल लोंढे
atul londhe
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 6:44 PM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुलींच्या प्रगतीबाबत केलेले वक्तव्य हे निषेधार्ह असून, या विधानातून त्यांच्या बुरसटलेल्या मनुवादी विचारसणीचे दर्शन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिलांबद्दलची चुल आणि मूल ही शिकवणच राज्यपाल महोदयांच्या मुखातून बाहेर आली असून, राज्यपाल कोश्यारी यांनी या असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्याबद्दल देशातील मुली व महिलांची माफी मागितली पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले.

दीक्षांत समारंभामध्ये विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करणे अपेक्षित

राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेताना लोंढे पुढे म्हणाले की, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. परंतु संघाच्या शिक्षणामुळे महिलांबाबतची संघाची मतंच त्यांच्या बोलण्यातून बाहेर आली. महिलांबद्दल संघाची मतं सर्वश्रुत आहेत. मनुस्मृतीला मानणारे हे लोक महिलांची प्रगती पाहू शकत नाहीत, हेच राज्यपाल महोदयांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मुली शिकून अशाच प्रगती करत राहिल्या तर 20 ते 30 वर्षांनंतर देशात आयएएसमध्ये मुलांपेक्षा मुली जास्त संख्येने दिसतील त्यासाठी बॅलन्स साधण्याचे प्रयत्न करा, असे म्हणणे हा बुरसटलेल्या मनुवादी पुरुषसत्ताक मानसिकतेचा प्रकार आहे.

हिमतीने त्या कुठेही कमी नाहीत हे सिद्ध करून दाखवले

मुलींनी प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या हिमतीने त्या कुठेही कमी नाहीत हे सिद्ध करून दाखवले. देशाचे पंतप्रधानपद, राष्ट्रपतीपद, राज्यपालपद, न्यायाधीशांच्या पदावरही महिलांनी काम करून त्या पुरुषांपेक्षा कशातही मागे नाहीत हे दाखवून दिले आहे. महिला जर प्रगती करत असतील तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय?

भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच वादग्रस्त ठरलेत

राज्यपाल पद हे संवैधानिक असून, या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. परंतु भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच वादग्रस्त ठरलेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाचा पाया रचला त्या महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून मुलींच्या शिक्षणाबदद्ल असे बोलणे हे खेदजनक तसंच संतापजनक आहे. कोश्यारी यांनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा त्यांनी धुळीस मिळवली आहे, असेही लोंढे म्हणाले.

संबंधित बातम्या

VIDEO: आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही; नवाब मलिकांनी ठणकावले

आर. आर. पाटलांच्या पावलावर पाऊल! नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारून एकनाथ शिंदे गडचिरोलीत, पोलिस जवानांसोबत दिवाळी साजरी

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.