Gram Panchayat Election Results 2021 : माळशिरसमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा धुराळा, 3 ग्रामपंचायतींवर विजयाचा झेंडा

सोलापूर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. अशात हाती आलेल्या माहितीनुसार, माळशिरसमध्ये 3 ग्रामपंचायतींवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला झेंडा फडकवला आहे. माळशिरस दुसऱ्या टप्प्यात सर्व चारही ग्रामपंचायतींवर विजयसिंह मोहिते पाटील गटाचा झेंडा. येळीव , विजयवाडी , खळवे , विठ्ठलवाडी या ग्रामपंचायती विजयसिंह मोहिते पाटील गटाने जिंकल्या. इतकंच नाही तर […]

Gram Panchayat Election Results 2021 : माळशिरसमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा धुराळा, 3 ग्रामपंचायतींवर विजयाचा झेंडा
विजयसिंह मोहिते पाटील
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 9:49 AM

सोलापूर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. अशात हाती आलेल्या माहितीनुसार, माळशिरसमध्ये 3 ग्रामपंचायतींवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला झेंडा फडकवला आहे. माळशिरस दुसऱ्या टप्प्यात सर्व चारही ग्रामपंचायतींवर विजयसिंह मोहिते पाटील गटाचा झेंडा. येळीव , विजयवाडी , खळवे , विठ्ठलवाडी या ग्रामपंचायती विजयसिंह मोहिते पाटील गटाने जिंकल्या. इतकंच नाही तर चौथ्या फेरीनंतर रेडेर गणेशगाव आणि पिरळे ग्रामपंचायतीवरही भाजपच्या मोहिते पाटील गटाची सत्ता आहे.

पंढरपूरमधील अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरूध्द पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटात चुरस पाहताना दिसत आहे. (Gram Panchayat Election Results 2021 Vijay Singh Mohite Patil win on 3 Gram Panchayats in Malshiras)

अकलूज ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विजयसिंह मोहिते पाटील गटाची एक हाती आहे सत्ता. त्यांच्या सत्तेला त्यांचे पुतणे धवलसिंह यांनी आव्हान दिले आहे. इथल्या 17 जागांपैकी एका जागेवर धवलसिंह यांच्या पत्नी उर्वशीराजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 16 जागांसाठी चुरसीने मतदान झाले आहे. त्यामुळे अकलूजच्या ग्रामपंचायतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मोहिते पाटील आणि अकलूज ही ओळख गेल्या 75 वर्षांपासून महाराष्ट्राला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूजच्या लोकसंख्या तब्बल 45 हजारापेक्षा जास्त असल्याने यावेळी अकलूज नगरपालिका करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. यासाठी ग्रामपंचायतीवर बहिष्काराची भूमिका सुरुवातीला मोहिते पाटील यांनी घेतली होती. पण विरोधकांच्या बैठकीनंतर पुन्हा ही निवडणूक लागली. खरंतर ही साधी ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी थेट बारामतीकरांचेही येथील प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष आहे. त्यामुळेच मोहिते विरुद्ध मोहिते या लढतीचे महत्व वाढले आहे.

दरम्यान, राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीतून एकूण 2 लाख 14 हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले. एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात 26,178 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 46,921 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली. ग्रामपंचायतींची निवडणूक ही पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर लढविली गेली नसली तरी राजकीय नेत्यांना आपला पाया भक्कम करण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या असतात. (Gram Panchayat Election Results 2021 Vijay Singh Mohite Patil win on 3 Gram Panchayats in Malshiras)

संबंधित बातम्या – 

Gram Panchayat Election Results 2021: काही क्षणांवर ग्रामपंचायतीचा निकाल, उमेदवारांची ‘दिल की धडकन तेज’!

Gram Panchayat Election Results 2021: गावगाड्यावर कुणाची सत्ता, कोण होणार पायउतार? थोड्याच वेळात निकाल

(Gram Panchayat Election Results 2021 Vijay Singh Mohite Patil win on 3 Gram Panchayats in Malshiras)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.