संजनाकडून प्रश्न सोडवून घ्या, हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणाला रामराम, उत्तराधिकारीही जाहीर

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे (Harshvardhan Jadhav announces political retirement).

संजनाकडून प्रश्न सोडवून घ्या, हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणाला रामराम, उत्तराधिकारीही जाहीर
Follow us
| Updated on: May 23, 2020 | 2:53 PM

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे (Harshvardhan Jadhav announces political retirement). त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करुन आपल्या निवृत्तीची घोषणा केली. हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचा खुलासा या व्हिडीओत केला आहे (Harshvardhan Jadhav announces political retirement).

हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले आहेत. सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवामुळे ते अस्वस्थ झाले होते. हर्षवर्धन जाधव गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि कौटुंबिक कलहामुळे चर्चेत होते. अखेर हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचा खुलासा केला.

हर्षवर्धन जाधव नेमकं काय म्हणाले?

“सध्या लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनदरम्यान सर्वजण आपापले छंद जोपासत आहेत. मीदेखील अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला आहे. त्यातून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची मला जाणीव झाली. त्यामुळेच मी निर्णय घेतला आहे की, आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी ही माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्या जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण संजनाकडून सोडवून घ्यावे, अशी मी विनंती करतो”, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.

“प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. आमच्याही घरात झाल्या. पण त्यामुळे काही वेगळ्या गोष्टी घडत असतील, असा त्याचा अर्थ नाही. मी संजना जाधव यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. रायभान जाधव यांच्या आशीर्वादाने आणि केंद्रीय मंत्री राबसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली संजना निश्चतच उत्तुंग भरारी घेतील, याबाबत शंका नाही. आपण कृपया यापुढे राजकीय, सामाजिक किंवा शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी थेट संपर्क साधावा. ते सगळे फोन उचलतात”, असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं.

कोण आहेत हर्षवर्धन ?

  • हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
  • हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
  • मात्र पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
  • त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
  • शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.

हेही वाचा :

आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील : हसन मुश्रीफ

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर, पिता-पुत्राप्रमाणे : संजय राऊत

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.