कडकनाथ कोंबड्या मागे लागल्या की खोतांना कळेल; शरद पवारांना डिवचल्यानंतर मुश्रीफांचं उत्तर

तुम्ही कधी क्रिकेट खेळला होता, तरीही तुम्ही क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होताच ना. मग सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली तर बिघडले कुठे? असा सवाल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. (hasan mushrif slams Sadabhau Khot over sharad pawar remarks)

कडकनाथ कोंबड्या मागे लागल्या की खोतांना कळेल; शरद पवारांना डिवचल्यानंतर मुश्रीफांचं उत्तर
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 6:26 PM

मुंबई: तुम्ही कधी क्रिकेट खेळला होता, तरीही तुम्ही क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होताच ना. मग सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली तर बिघडले कुठे? असा सवाल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. खोत यांच्या या टीकेचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या खास स्टाईलने समाचार घेतला आहे. कडकनाथ कोंबड्या मागे लागल्यावर खोतांना कळेल काय ते, असा पलटवार हसन मुश्रीफ यांनी केला आहे. (hasan mushrif slams Sadabhau Khot over sharad pawar remarks)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ यांनी हा टोला लगावला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यावर सेलिब्रिटी ट्विट करत आहेत. शरद पवारांनी वडिलकीच्या नात्याने सचिन तेंडुलकरला सल्ला दिला. शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत भाजपमध्ये गेले आहेत. पवारांवर टीका करताना त्यांना लाज वाटायला हवी होती. पवार साहेब, हे खेळावर प्रेम करणारे आणि खेळाची आवड असलेली व्यक्ती आहे. त्यांनी आयपीएल सुरू करून ग्रामीण भागातील टॅलेंट शोधून काढण्याचं काम केलं. क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर मानधन मिळवण्यासाठी योजना आणली. खोतांनी तर कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायातून त्यांनी अनेक बेरोजगारांनना फसवले. त्यांच्या चिरंजीवावर पोलीस केस आहे. कडकनाथ कोंबड्या मागे लागल्या की कळेल खोतांना, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.

काय म्हणाले होते खोत?

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली होती. ज्यांना ज्या क्षेत्रातल कळत त्यातल त्यांनी बोलावं, असं विधान शरद पवारांनी केलं. हे ऐकून थोडा वेळ हसू आलं, असं खोत म्हणाले होते. शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती?, असा सवालही त्यांनी केला होता. अनेक विषय असतात अनेकांना वाटत मला सोडून दुसऱ्याला कळत नाही अशी कमी लेखण्याची पध्दत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक असल्याचंही ते म्हणाले होते.

रिहानाला भारतातील शेतकऱ्यांचा कळवळा

पॉपस्टार रिहानानं कायतरी ट्विट केलं, तिला भारतातील शेतकऱ्यांचा कळवळा आला. ती ज्या खंडात राहते तिथ काही लोक अर्ध पोटी राहतात त्याबद्दलही कधी ट्विट करायला पाहिजे होते, असं खोत म्हणाले होते. (hasan mushrif slams Sadabhau Khot over sharad pawar remarks)

शरद पवार सचिनच्या ट्विटवर काय म्हणाले?

सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर काही भूमिका घेतली असली, तरी सामान्य लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तेव्हा काळजी घेतली पाहिजे, हा माझा सचिनला सल्ला आहे, असं शरद पवार म्हणाले होते. (hasan mushrif slams Sadabhau Khot over sharad pawar remarks)

संबंधित बातम्या:

पाकिस्तानमध्ये 18 वर्ष कारावास, 15 दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या महिलेचा औरंगाबादेत मृत्यू

समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करणार; मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

‘हे सगळे तथाकथित सेलिब्रिटी, सरकारचे अनुदान घ्यायला सोकावले’, राजू शेट्टींचं चौकशीला समर्थन

(hasan mushrif slams Sadabhau Khot over sharad pawar remarks)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.