महाराष्ट्रातील 81 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नाहीत : आरोग्य मंत्री

महाराष्ट्रात आतापर्यंत 12 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली (Corona symptoms) असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रातील 81 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नाहीत : आरोग्य मंत्री
Follow us
| Updated on: Apr 20, 2020 | 11:49 PM

मुंबई : महाराष्ट्रात आतापर्यंत 12 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली (Corona symptoms) असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 81 टक्के कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. ते रुग्णालांमध्ये निवांत बसून आहेत. ते निवांत टीव्ही बघत आहेत आणि वृत्तपत्रे वाचत आहेत. लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या 17 टक्के आणि आयसीयूमध्ये असणाऱ्यांची संख्या 2 टक्के आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका. काही लक्षणे आढळल्यास स्वत:हून टेस्टसाठी पुढे या, असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं (Corona symptoms).

राजेश टोपे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्यातील डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या प्रत्येकांचे आभार मानले. “राज्यात आजचा कोरोनाबाधितांचा आकडा 4,666 वर पोहोचला आहे. आज पुन्हा 350 ते 400 दरम्यान वाढ झाली आहे. परंतु डिस्चार्ज झालेल्यांची संख्यादेखील 572 आहे. आतापर्यंत 232 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे तिन्ही आकडे सांगणे गरजेचं आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.

“राज्य सरकार सर्व गोष्टी नियमानुसार, काटेकोरपणे आणि गाभिर्याने करत आहे. हे मला अत्यंत जबाबदारीनं सांगणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या टेस्ट झाल्या आहेत तेवढ्या देशामध्येही कुठे झालेल्या नसतील. महाराष्ट्रात 76 हजार टेस्ट झाल्या आहेत. यापैकी मुंबईत 50 हजारपेक्षाही जास्त टेस्ट झाल्या आहेत. यापैकी फक्त 2 टक्के लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे”, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.

“आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग फार मोठ्या प्रमाणात करतोय. महाराष्ट्रात जवळपास 368 कंटेन्मेंट झोन आहेत. महाराष्ट्रात 6,359 एवढ्या जणांची सर्व्हिलन्सची टीम आहे. ही टीम राज्यभरातील घराघरात जाऊन कुणाला ताप, खोकला, सर्दी, घसा खवखवतो आहे का? किंवा काही लक्षणे दिसत आहेत का? या साऱ्या गोष्टींचं अवलोकन करण्याचं काम करत आहे. त्यामुळे जिथेही शंका आली त्याच्या अनुषंगाने कुठलीही तडजोड न करता त्यांच्या सगळ्यांचा टेस्ट घेतल्या जात आहेत. संशयितांना क्वारंटाईन केलं जात आहे आणि लक्षणे दिल्यास टेस्ट घेतली जात आहे. राज्यात जवळपास 87,254 लोकांना होम क्वारंटाईन केलं आहे. तर 6743 लोक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये आहेत”, असं राजेश टोपे म्हणाले.

“आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्यामार्फत आपण अॅनालिटिक्स करण्याचा प्रयत्न केला आहे. आपला डबलिंग रेट हा पूर्वी 2 होता, नंतर तो साडे तीन दिवसांवर आला, त्यानंतर साडेपाच दिवसांचा झाला, आता हा रेट 6.7 एवढ्या दिवसांनी डबल होत आहे. त्यामुळे सुधारणा होत आहे. परंतु आपल्याला तेवढ्यावर समाधान मानायचं नाही. कारण आपल्याला कोरोनातून कायमचं मुक्त व्हायचं आहे. त्यामुळे हा डबलिंग रेट खूप मोठा आकडा झाला पाहिजे”, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

संबंधित बातम्या :

Corona Update : देशभरात 2546 रुग्णांची कोरोनावर मात, गेल्या 24 तासात 1553 नवे बाधित

Corona Update | मुंबईतील कोरोनाचा आकडा 3032 वर, राज्यात 4666 रुग्ण

सोलापुरात कोरोनाचा विळखा वाढला, दिवसभरात 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.