AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health University|आरोग्य विद्यापीठात यावर्षी 7 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम होणार सुरू; 670 कोटींचा प्रकल्प

नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात सुरू होणाऱ्या नव्या अभ्यासक्रमांसाठी एकूण 49 अनुभवी अधिष्ठाता व विशेष तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Health University|आरोग्य विद्यापीठात यावर्षी 7 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम होणार सुरू; 670 कोटींचा प्रकल्प
Maharashtra University of Health Sciences, Nashik
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 7:05 AM

नाशिकः राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. आता नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यासाठी एकूण 7 विषयांना शासनस्तरावर मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षात अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांची निवड करून या अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. तब्बल 670 कोटी रुपयांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

हे अभ्यासक्रम होणार सुरू

आरोग्य विज्ञान विद्यापीठातील नव्या अभ्यासक्रमातंर्गत औषध वैद्यक शास्त्र 12, बालरोग चिकित्सा शास्त्र 06, शल्य चिकित्सा शास्त्र 12, अस्थिरोग शास्त्र 06, भूलशास्त्र 14, स्त्रीरोग चिकित्सा व प्रस्तुती शास्त्र 06, आपत्कालीन औषध वैद्यकशास्त्र 03 अशा एकूण 59 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी एकूण 49 अनुभवी अधिष्ठाता व विशेष तज्ज्ञांची नेमणूक करण्यासाठी जाहिरात देण्यात आली असून, 27 ते 31 जानेवारी 2022 या दरम्यान मुलाखत घेवून निवड करण्यात येणार आहे. सदरचा प्रकल्प हा 670 कोटी रुपयांचा असून, विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीच्या कामकाजाबाबत आवश्यक सर्व प्रमाणपत्र, सामंजस्य करार व इतर महत्वपूर्ण बाबींची पूर्तता करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

भव्य इमारत उभारणार

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत इमारत बांधकाम संदर्भात प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास शासनस्तरावर मान्यता मिळण्यासाठी मी स्वत: लक्ष घालणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे बांधकाम करतांना अनुभवी तज्ज्ञ वास्तू विशारदाची नेमणूक करून त्यांच्यामार्फत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने उत्कृष्ट प्रतिचे बांधकाम करावे. तसेच नव्याने तयार होणारे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम व इतर आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासल्यास शासनस्तरावर आवश्यक ती सर्व मदत व वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिली आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाचा 60 टक्के व आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचा 40 टक्के निधी या तत्वावर काम करण्यात येणार आहे. – कालिदास चव्हाण, कुलसचिव, आरोग्य विज्ञान विद्यापीठ

इतर बातम्याः

Nashik Train|आनंदवार्ता: नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू 10 जानेवारीपासून होणार सुरू

Gold Price|ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना…भावात चक्क 600 रुपयांची घसरण, चांदीही 60 हजारांखाली!

Nashik|नाशिक जिल्ह्यात 72935 नागरिकांना मिळणार हक्काचं घर, काय आहे योजना?

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.