BREAKING : राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला

दिवंगत खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर हल्ला झालाय. प्रज्ञा सातव यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.

BREAKING : राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला
आमदार प्रज्ञा सातव
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 11:43 PM

हिंगोली : दिवंगत खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर हल्ला झालाय. प्रज्ञा सातव यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीने आपल्यावर हल्ला केल्याचं प्रज्ञा सातव म्हणाल्या आहेत. माझ्या जीवाला धोका आहे, असं ट्विट प्रज्ञा सातव यांनी केलंय. महिला आमदारावर हल्ला हा लोकशाहीवर हल्ला असंदेखील प्रज्ञा सातव म्हणाल्या. तसेच कळमनुरी तालुक्यातील एका गावात हा हल्ला झाल्याचं प्रज्ञा सातव यांनी सांगितलं आहे. प्रज्ञा सातव यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला या प्रकरणाबद्दल माहिती दिली.

“मी कळमनुरी तालुक्यात काही गावांच्या दौऱ्यावर होती. या दरम्यान कसगे धावंडा या गावी गाडीतून उतरत होती तेव्हा एक इसम माझ्या गाडीच्या दरवाज्याजवळ आला. त्यामुळे मी पटकन गाडीत बसली आणि दार लावून घेतलं. नंतर माझ्या बॉडिगार्डने त्याला बाजूला केलं”, असं प्रज्ञा सातव यांनी सांगितलं.

“बॉडीगार्डने त्या इसमाला बाजूला केल्यानंतर मी उतरुन नियोजित कार्यक्रमाला गेली. तिथे मी इतरांशी बोलू लागली. तेव्हा हा इसम मागून आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. मी पटकन सावरली आणि सगळ्यांनी त्याला पकडलं. लगेच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली”, अशी माहिती प्रज्ञा सातव यांनी दिली.

‘हा पूर्वनियोजित कट असू शकतो’

“संबंधित इसम माझ्या ओळखीचाही नव्हता. बहुतेक तोही मला ओळखत नसावा. पण तेवढ्या गर्दीत तो बरोबर माझा शोध घेऊन तिथे आला. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असू शकतो किंवा कुणीतरी आधीच थांबून ठेवलेलं असेल. कारण मी जाणार असल्याची माहिती कालच त्या गावात दिली गेली होती”, असं त्यांनी सांगितलं.

“सुरक्षेत चूक झालेली नाही. माझी बॉडीगार्ड होती. ती माझ्या बाजूला उभी होती. पण समोर बघत होती. पण इसमाने मागून येऊन हल्ला केला. आजपर्यंत कधी असं वाटलं नाही. मी रोजच फिरत असते. त्यामुळे असं कधी होईल वाटलं नव्हतं”, असं प्रज्ञा सातव म्हणाल्या.

“पुन्हा कुणाची अशी हिंमत होऊ नये म्हणून मी शांत न बसता पोलिसांकडे तक्रार केलीय. कारण आपण शांत बसलो तर समोरच्याची हिंमत अजून वाढेल”, असं प्रज्ञा म्हणाल्या.

‘ही मोठी गंभीर बाब’, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलंय. “विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर कसबे धवंडा, ता. कळमनुरी येथे झालेला हल्ला ही मोठी गंभीर बाब आहे. एका महिला लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे हल्ला होतो हे खेदजनक आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“माझी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, तातडीची बाब म्हणून प्रज्ञा सातव यांना सुरक्षा द्यावी. या प्रकरणाची कसून चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...