असं काय घडलं की कृषीमंत्री अब्दुल सत्तार अधिकाऱ्यांवर इतके संतापले? पाहा VIDEO

कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज हिंगोलीत अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांचा अधिकाऱ्यांना झापण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत सत्तार किती रागावले आहेत ते स्पष्टपणे दिसत आहे.

असं काय घडलं की कृषीमंत्री अब्दुल सत्तार अधिकाऱ्यांवर इतके संतापले? पाहा VIDEO
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 6:14 PM

हिंगोली : महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुस सत्तार आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी होते. या बैठकीला हजेरी लावणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना कल्पनाही नव्हती ती गोष्ट घडली. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज अनेक अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. अब्दुल सत्तार यावेळी प्रचंड चिडले होते. ते प्रचंड संतापात होते. सत्तार बैठकीत संतापात असताना नेमकं काय म्हणाले किंवा कसे बोलले ते एका व्हिडीओतून समोर आलं आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतोय.

अब्दुल सत्तार नेमकं का चिडले असावेत? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. पण त्यामागे महत्त्वाचं कारण आहे. अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक कामगिरी केली नसल्याने सत्तार संतापले. त्यामुळे त्यांनी अनेक अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. अब्दुल सत्तार यांनी तब्बल दोन ते अडीच तास ही बैठक घेतली. या बैठकीवेळी सत्तार यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

अब्दुल सत्तार बैठकीत नेमकं काय म्हणाले?

शिक्षण विभागाने मागील वर्षाचा निधी खर्च केल्याने शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशा सूचना अब्दुल सत्तार यांनी दिल्या. तर महावितरण कार्यालय शेतकऱ्यांना पैसे असून वेळेवर रोहित उपलब्ध करून देत नसल्याने सत्तार यांनी चांगलीच कान उघडणी केली.

हे सुद्धा वाचा

जानेवारी महिन्यात सूचना देऊनही कृषी भवनाचा प्रस्ताव तयार न केल्याने सत्तार यांनी कृषी अधिकाऱ्यावर संताप व्यक्त केला. वेळेवर कर्ज पुरवठा न करणाऱ्या बँकावर कारवाई करण्याचे आदेशही अब्दुल सत्तार यांनी दिले.यावेळी सभागृहातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र हिरमुडलेल्या अधिकाऱ्यांनी नाश्ता न करताच बैठक झाल्यानंतर काढता पाय घेतला.

सत्तार यांनी याआधीही संताप व्यक्त केलाय

अब्दुल सत्तार यांच्याकडून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी महाविकास आघाडीचं सरकार असतानादेखील सत्तार हे अधिकाऱ्यांवर चिडले होते. त्यावेळी ते महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री होते. त्यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विविध विकास योजनांचा आढावा घेतला होता. त्यावेळी ते अधिकाऱ्यांवर संतापले होते.

अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांकडून घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची थातूरमातूर यादी पाहून संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले होते. फुकटचा पगार घेता का? असे काम तुमच्या बापाने कधी केले होते का? अशा शब्दांत सत्तार यांनी सुनावलं होतं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.