Special report अशी आहे सप्तश्रृंगी देवीची कथाः गिरिजेचे रूप, द्रोणागिरीचा भाग; आठ फूट उंचीची, अठरा भुजांची माता!

सप्तश्रृंगी देवीचे मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हटले जाते. या मंदिराचे राम-सीता आणि छत्रपती शिवरायांनी दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळतो. चला तर मग, जाणून घेऊयात या धार्मिक स्थळाचे महत्त्व आणि इतिहास...

Special report अशी आहे सप्तश्रृंगी देवीची कथाः गिरिजेचे रूप, द्रोणागिरीचा भाग; आठ फूट उंचीची, अठरा भुजांची माता!
नाशिक जिल्ह्यातल्या सह्याद्री डोंगर रांगात सप्तश्रृंगीचे विलोभनीय मंदिर आहे.
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 6:39 PM

मनोज कुलकर्णी, नाशिकः नाशिक जिल्ह्यातले सप्तश्रृंगी देवीचे मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हटले जाते. या मंदिराचे राम-सीता आणि छत्रपती शिवरायांनी दर्शन घेतल्याचा उल्लेख पुराणात आणि बखरीमध्ये आढळतो. चला तर मग, जाणून घेऊयात या धार्मिक स्थळाचे महत्त्व आणि इतिहास…

सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर…

सप्तश्रृंगी. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले हे ठिकाण. सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरे आहेत. त्यावरून या गडाला सप्तश्रृंगी म्हटले जाते. गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा, शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या वणीतले हे रमनीय ठिकाण. समुद्रसपाटीपासून गडाची 4569 फूट उंची आहे. या गडाला एकूण 472 पायऱ्या आहेत. गड चढण्याचा आणि उतरण्याचा दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत.

भागवत पुराणात उल्लेख…

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे वणीची सप्तश्रृंगी देवी. साडेतीन शक्तीपीठांना ॐ काराचे सगुण रूप मानतात. ओंकारात साडेतीन मात्रा आहेत. त्यातील ‘अ’कार पीठ म्हणून माहूर ओखले जाते. ‘उ’कार पीठ तुळजापूर, ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा म्हणजेच सप्तश्रृंगी. हे अर्धपीठ आहे. कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही, असा उल्लेख भागवत पुराणात आढळतो. शुंभनिशुंभ व महिषासुरांचा वध केल्यानंतर देवीने या गडावर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते.

आठ फूट उंची, अठरा भुजा…

ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून गिरिजा महानदी प्रकटली. तिचे रूप म्हणजे सप्तश्रृंगी. देवीची मूर्ती स्वयंभू असून, ती आठ फूट उंच आहे. तिला अठराभुजा आहेत. मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत. महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते. मंदिराच्या गाभाऱ्याला तीन दरवाजे आहेत. शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. या दरवाजातून मातेचे दर्शन होते. असे म्हटले जाते की, चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते. शारदीय नवरात्रात गंभीर. निवृत्तीनाथ या मातेला आपली कुलस्वामिनी मानत. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी या गडावर ध्यान केल्याचे म्हटले जाते.

मंदिराची आख्यायिका

सप्तश्रृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे. येथे देवीने त्रिशुळाने महिषासुराच्या धडापासून शीर वेगळे केले. त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली. ती आजही दिसते, असे म्हणतात. या ठिकाणी महिषासुराच्या शीराचे पूजनही केले जाते. लीळाचरित्रातही या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. राम आणि रावणाचे युद्ध झाले. त्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला. त्याला लक्ष्मण शक्ती लागली. यावेळी लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी मारुतीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्याचा काही भाग जमिनीवर पडला. तो म्हणजे सप्तश्रृंगी, असे म्हटले जाते. राम-सीतेने वनवासात इथले दर्शन घेतले. छत्रपती शिवरायही या देवीच्या दर्शनासाठी आल्याचा उल्लेख बखरीमध्ये आढळतो.

दरवर्षी मोठी यात्रा

नवरात्रोत्सवात दरवर्षी सप्तश्रृंगी गडावर मोठी यात्रा भरते. राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येथे येतात. गड परिसरातील वातावरण निसर्गरम्य आहे. त्यामुळे कुणालाही इथल्या स्थळाची भुरळ पडते. लाखो भाविकांचे सप्तश्रृंगी माता कुलदैवत आहे. प्रभू रामचंद्रापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांनी या स्थळाला भेट दिली. या ऐतिहासिक आणि धार्मिक गडावर तुम्ही पोहचलात की मन प्रसन्न होऊन जाते.

सप्तश्रृंगी गडावर कसे पोहोचाल?

हवाई मार्गेः सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ. शहराच्या मध्यभागीपासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे द्वारेः जवळचे रेल्वे स्थानक नाशिकरोड 75 किमी आहे. रस्त्यानेः नाशिक रस्तामार्गे चांगले जोडलेले आहे. नाशिक ते सप्तश्रृंगी मंदिर जवळ जवळ 65 कि.मी.आहे.

इतर बातम्याः

नाशिकमध्ये 122 नगरसेवक गॅसवर; कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार!

महापालिकेआधीच राजकीय धुळवड; नाशिकमध्ये 15 ऑक्टोबरपासून तब्बल 192 सहकारी संस्थांच्या निवडणुका

नारायणी नमोस्तुते! सप्तश्रृंगी गडावर रोज 28 हजार भाविकांना मिळणार दर्शन; जाणून घ्या नियम अन् कुठे मिळेल पास?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.