AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

School holiday : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात देखील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
| Updated on: Jul 25, 2024 | 8:25 PM
Share

राज्यात अनेक ठिकाणी कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. अनेक जिल्ह्यातील गांवांचा सपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी देखील हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि रायगडला रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा रेड अलर्ट असल्याने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी यांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती शासनाने हा निर्णय घेतला आहे.

हवामान खात्याचा रेड अलर्ट

ठाण्यातील शाळा, खाजगी अनुदानित, अशतः अनुदानित व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळाना देखील उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून उद्या ही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमाच्या / मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

शाळांना सुट्टी जाहीर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातील शाळेंना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने ठाणे जिल्ह्याला दिलेल्या अतिवृष्टीच्या इशारा नंतर पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी ही सूचना केली आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्वच माध्यमाच्या मंडळाच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर झाली आहे.

रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत

रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर आज रोहा शहरातील दमखाडी येथे पुरामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा मंत्री अदिती तटकरे यांनी घेतला. पूरग्रस्त भागाचे पंचनामे लवकरात लवकर करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. एकही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही यांची काळजी घेण्याबाबतही प्रशासनाला निर्देश दिले आहेत. यावेळी ग्रामस्थांची विचारपूस करत त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर

बदलापूरची उल्हास नदी अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर आहे. आज दिवसभरात उल्हास नदीने 18.80 मीटरची पाणीपातळी गाठली आहे. सध्या उल्हास नदीची पाणी पातळी 18.20 मीटरवर आहे. रस्त्यावरचं पाणी ओसरल्यामुळे बदलापूर शहराकडून ग्रामीण भागाकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. पाऊस पूर्णपणे थांबल्यामुळे नदीची पाणीपातळी ओसरण्यास सुरुवात झालीये.

बारवी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मासेमारीसाठी गेलेले दोन जण वाहून गेले आहेत. गणेश केणे (35) आणि ज्ञानेश्वर गोंधळी (35) अशी वाहून गेलेल्यांची नावं आहेत. टाकीची वाडी इथून मासेमारी करताना दोघे वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दल, महसूल विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांच्याकडून शोध कार्य सुरू आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.