विधानसभा निवडणुकीत महायुती किती जागा जिंकणार? राहुल नार्वेकर यांचा मोठा दावा

मुंबईत टीव्ही 9 च्या सत्ता संमेलन या कार्यक्रमात राहुल नार्वेकर यांनी अनेक मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. सत्तासंघर्षावर बोलताना त्यांनी म्हटले की, मी दिलेला निर्णय योग्य आहे. सुप्रीम कोर्ट देखील माझा निर्णय कायम ठेवेल असं मला वाटतं. महायुतीला किती जागा मिळणार याबाबत ही त्यांनी मोठा दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती किती जागा जिंकणार? राहुल नार्वेकर यांचा मोठा दावा
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 6:02 PM

मुंबईत टीव्ही 9 च्या सत्ता संमेलन या कार्यक्रमात बोलताना राहुल नार्वेकर यांनी रोखठोक मतं मांडली. विधानसभा निवडणुकीत ते कुलाबा मतदारसंधातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने त्यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून तिकीट दिले आहे. ते विधानसभा अध्यक्ष ही होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात बंडखोरी झाली तेव्हा त्यांच्याकडे या प्रकरणावर निर्णय घेण्याची जबाबदारी होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी दिलेला निर्णय शाश्वत आहे. त्यात कोणताही चूक नाही. तो बेकायदेशीर नाही. सर्वोच्च न्यायालयाने ज्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार हा निर्णय दिला आहे. मला वाटतं माझा निर्णय कोर्टही बदलणार नाही. हा निर्णय लोकशाही मजबूत करणारा असेल.

पुढे ते म्हणाले की, संजय राऊत काय म्हणतात आणि त्याकडे किती लक्ष द्यावं हे तुम्ही जाणताच. कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. मी हा निर्णय दिला. काही लोकांना हा निर्णय योग्य वाटला नाही. मी दिलेल्या निर्णयातील कोणती गोष्ट चुकीची आहे, हे मला सांगावं. कोर्टाच्या किंवा संविधानाच्या निर्णयाविरोधात आहे हे दाखवून द्या, असं आव्हानच मी दिलं होतं. हा निर्णय दिल्लीतून लिहून आला होता. हा निर्णय देण्यासाठी राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष केलंय असं सांगितलं गेलं होतं.

‘लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्यातून आम्ही खूप काही शिकलो. या देशात पहिल्यांदा फेक नरेटिव्ह कसा निवडणुकीवर परिणाम करून गेला हे आपण पाहिलं. संविधान बदलण्यासाठी भाजपला ४०० पार जागा हव्या आहेत, असा आरोप विरोधकांनी केला होता. हा नरेटिव्ह सेट केला होता. येणाऱ्या काळात आम्ही असा फेक नरेटिव्ह चालू देणार नाही. जनताही हा नरेटिव्ह चालू देणार नाही. असं ही ते म्हणाले.

‘आम्हाला ४०० हून अधिक जागा मिळायला हव्या असं आम्हाला वाटत होतं. जेवढी अपेक्षा होती, तेवढी आमची पूर्ण झाली नाही. पण नेहरु यांच्या नंतर तिसऱ्यांदा एखादा व्यक्ती पंतप्रधान झाला आहे. एखादा पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत आला आहे. ही साधी गोष्ट नाही. जो डिस्टिंक्शनमध्ये पास झाला आहे, त्याला हरलाय असं म्हणताय. जो हरलाय त्याचा विजय साजरा केला जात आहे, हे फारच विचित्र आहे.’

युती सरकारला किती जागा मिळणार?

राहुल नार्वेकर म्हणाले की, ‘फेक नरेटिव्हच्या थिअरीमुळे आमचं नुकसान झालं. जेवढं यश हवं होतं तेवढं मिळालं नाही. लोकसभेचा परफॉर्मन्स विधानसभेत होणार नाही. राज्यात युती सरकारच येणार आहे. युती सरकारला कमीत कमी १७५ जागा मिळतील. भाजप मोठा पक्ष होईल. मुख्यमंत्रीपदाची आमची एक प्रक्रिया असते. पण ते आम्ही टीव्ही शोवर सांगत नाही. आमचे वरिष्ठ नेते आणि पार्लमेंटरी बोर्ड मुख्यमंत्रीपदाचं ठरवेल.’

‘देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुढचं सरकार होईल हे मोदींनी रॅलीत सांगितलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरे हे टाळ्या वाजवत होते. हे जगाने पाहिलं आहे. आम्ही ही निवडणूक प्रभावी नेतृत्व, गुड गव्हर्नन्स आणि विकासाच्या नावाने लढवत आहोत. एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा हे प्रभावी नेते आहेत. या तिघांनी विकास कामाला गती दिली आहे.’

‘भाजप कोणत्याही गोष्टीत फसण्याच्या कारणाने निर्णय घेत नाही. आम्ही राष्ट्र प्रथम मानणारे आहोत. राष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेऊन जाण्याची वेळ येते तेव्हा भाजप मोठं मन दाखवून सर्वांना सोबत नेत असते.’

उद्धव ठाकरेंचा दावा खोटा

‘उद्धव ठाकरे जो दावा करत होते ते सर्व खोटं होतं. भाजपचा मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं. पण त्यांनी भाजपची साथ सोडली. भाजपने कधीच शिवसेनेची साथ सोडली नाही. पण तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी नाही. एकनाथ शिंदे यांच्या पार्टीसोबत असा कोणता करार झाला नव्हता. जेव्हा ताक पिण्याची वेळ असते तेव्हा आम्ही ताक पितो. जेव्हा दूध प्यायची वेळ येते तेव्हा दूध पितो.’

‘आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवलं. सामान्य लोकांना मुख्यमंत्री केलं. पहिल्यांदाच विधानसभेत आलेल्यांना विधानसभा अध्यक्ष बनवलं. त्यामुळे भाजपवर घराणेशाहीचा आरोप करणं चुकीचं आहे. एक महत्त्वाचा नेता आहे. त्या नेत्याचा एखादा कॅपेबल मुलगा किंवा मुलगी असेल.. त्याने स्वत:ला सिद्ध केलं असेल तर त्याला मेरीटवर संधी देऊ नये का. मेरिट असूनही संधी नाकारणं हे घराणेशाहीपेक्षाही अत्यंत डेंजर आहे.’

‘अनेक राजकीय पक्ष या निवडणुकीत लढत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एका बाजूला विचारधारा असणारा पक्ष आहे. तर दुसरीकडे विचारधारा नसलेला पक्ष आहे. शरद पवार यांच्या ओरिजिनल पक्षाची विचारधारा नेमकी काय आहे हे पवारांनाही माहीत नसेल. फ्लेक्सिबल असणं हीच त्यांची विचारधारा आहे. काँग्रेस आणि शिवसेना एकसोबत येणं चूक आहे. बाळासाहेब म्हणाले काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेल असं बाळासाहेब म्हणायचे. आघाडीत जो विरोधाभास आहे, तो महायुतीत नाही.’ असं ही शेवटी ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?.
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी.
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा.
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा.
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले....
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले.....
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात.
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला....
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला.....
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?.
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?.
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन.