HSC-SSC Exam | दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात, औरंगाबाद नांदेडसह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचीही मागणी
मार्च महिन्यात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाने जाहीर केलेले आहे. या वर्षीच्या परीक्षा एक तर पुढे ढकलण्यात याव्यात किंवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा न घेता ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
औरंगाबादः दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन (HSC- SSC Exams) व्हाव्यात या मागणीसाठी आज राज्यभरातील विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad Student) आणि नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) विद्यार्थ्यांनीही आज ही मागणी लावून धरली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही वर्गांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं शक्य नसल्याचं शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र यंदाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने न घेता ऑनलाइन पद्धतीनेच घ्याव्यात, या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद आणि नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ही मागणी लावून धरली.
औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं
औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली. कोरोना संकटामुळे या वर्षी शाळा अनियमित झाल्या. तिसऱ्या लाटेनंतर आता कुठे शाळा सुरु होत आहेत, त्यातच पुढील महिन्यात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाने जाहीर केलेले आहे. या वर्षीच्या परीक्षा एक तर पुढे ढकलण्यात याव्यात किंवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा न घेता ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
नांदेडमध्येही विद्यार्थी उतरले रस्त्यावर
नांदेडमध्येही विद्यार्थी संघटनांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याविरोधात आंदोलन केलं. नांदेडमध्ये विद्यार्थ्यांनी पूर्व परवानगीशिवाय हे आंदोलन केलं. त्यामुळे फार काळ त्यांना निदर्शनं करता आली नाहीत. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केलं.
दहावी बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच- वर्षा गायकवाड
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
इतर बातम्या-