VIDEO: ठाकरे सरकारच्या आणखी 6 मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार, किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर नेमकं कोण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅट्स ईडीने जप्त केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. कालचं प्रकरण फक्त सुरुवात आहे.

VIDEO: ठाकरे सरकारच्या आणखी 6 मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार, किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर नेमकं कोण?
किरीट सोमय्या Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 12:17 PM

ठाणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर ((shridhar patankar)) यांचे 11 फ्लॅट्स ईडीने जप्त केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. कालचं प्रकरण फक्त सुरुवात आहे. पुढच्या काही दिवसात उद्धव ठाकरेंच्या सहा मंत्र्याचे घोटाळे बाहेर काढणार आहे. तपासानंतर काय कारवाई झाली हे जनतेला दिसेलच. घोटाळेबाज सरकारला मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे, असं किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितलं. आरोप शब्दाचा डिक्शनरीत मराठी अर्थ बघितला तर माझ्याकडे काहीच पुरावे नाही आणि मी बोलतो त्याला आरोप म्हणतात. बाप-बेटे 30 दिवसात तुरुंगात जातील असा दावा राऊतांनी केला होता. 30 दिवसानंतर त्यांनी एकही कागद दिला नाही काहीच नाही. कोर्टानेही झापलं. राज्य सरकारनेही नील सोमय्या विरोधात काहीच नसल्याचं स्पष्ट केलं. काहीच नसताना बोलणं म्हणजे आरोप म्हणतात, असं सोमय्या यांनी सांगितलं.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरही ईडीने केलेल्या कारवाईवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. नीलांबरी प्रोजेक्ट ठाणे, श्री साईबाबा, श्रीधर पाटणकर उर्फ ठाकरेंचे मेव्हणे, पुष्पक बुलियन, महेश पटेल, चंद्रकांत पटेल, हवाला ऑपरेटर हमसफर डिलर यांचे संबध काय आहेत. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी 2014 मध्ये जी कंपनी बनवली त्यात आदित्य ठाकरे मालकपण आहेत. नंदकिशोर हा हवाला ऑपरेटर आहे. त्याच्याकडे ठाकरेंनी कंपनी का दिली, ठाकरे परिवाराचे त्यांच्याशी संबंध काय, हे ठाकरे परिवाराचं हे पहिलंच मनी लॉन्ड्रिंगचं काम आहे की, या आधीही केलीयत असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.

आर्थिक व्यवहाराबाबत मुख्यमंत्री बोलणार का?

‘उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी सर्व डिटेल्स आताच उघड करावेत. त्यामुळे तपास यंत्रणांचे काम वाचेल. 19 बंगले लपवण्याचा खूप प्रयत्न उद्धव साहेबांनी केला. शेवटी खरं बाहेर आलंच. 2019 मध्ये रश्मी ठाकरे म्हणतात बंगले माझे आहेत आणि आज उद्धव ठाकरे म्हणतात तिथे बंगलेच नाहीत. अशाच पद्धतीचा हा किस्सा आहे. श्रीधर पाटणकर आणि रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे आर्थिक व्यवहारांबाबत उद्धव ठाकरे बोलणार का? ‘ असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारमध्ये मतभेद आहेत काय?, Sanjay Raut यांनी पहिल्यांदाच दिली कबुली; नेमकं काय म्हणाले?

BJP नेते रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?; संजय राऊतांचा सवाल

Somaiya on Thackeray | ठाकरे परिवाराचं हे पहिलंच मनी लॉन्ड्रिंगचं काम की…सोमय्यांचा तिखट सवाल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.