IAS टीना डाबींसोबत लग्नाच्या बेडीत अडकणारे कोण आहेत डॉ. प्रदीप गावंडे?

टीना डाबी या स्वतः यूपीएससी टॉपर आहेत. विशेष म्हणजे त्यांची लहान बहीण रिया दाबी या सुद्धा आएएस अधिकारी आहेत. त्यांनी 2020 मध्ये यूपीएससी परीक्षेत 15 वा रँक मिळवला आहे.

IAS टीना डाबींसोबत लग्नाच्या बेडीत अडकणारे कोण आहेत डॉ. प्रदीप गावंडे?
डॉ. प्रदीप गावंडेंसोबत टीना डाबी.
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 1:34 PM

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2015 च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या टीना डाबी (Tina Dabi) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांचे दुसरे लग्न. होय, टीना डाबी पुन्हा एकदा लग्न करतायत. 22 एप्रिल रोजी जयपूर येथे मोठ्या धूमधडाक्यात त्या लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्याची माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करून दिलीय. यापूर्वी टीना डाबी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2015 च्या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या अतहर खान यांच्याशी लग्न केले होते. ते दोघे आएएसच्या प्रशिक्षणाच्या काळातच एकमेकांच्या प्रेमात (Love) पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे दोघांनाही राजस्थान केडर मिळाले होते. त्याचे 2018 मध्ये लग्न झाले. अतहर मूळचे काश्मीरचे आहेत. मात्र, हे नाते टिकवण्यात टीना आणि अतहर अयशस्वी ठरले. त्यानंतर दोन वर्षांतच त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता टीना यांनी जीवनसाथी म्हणून 2013 च्या बॅचचे आएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांची निवड केलीय. जाणून घेऊयात कोण आहेत, हे प्रदीप गावंडे…

कोण आहेत डॉ. प्रदीप गावंडे?

प्रदीप गावंडे हे मूळचे महाराष्ट्रचे. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1980 रोजी झालाय. त्यांनी औरंगाबादमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा यूपीएससीकडे वळवला. त्यांनी 2013 मध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. ते टीना डाबी यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत. यापूर्वी 2020 मध्ये ते चुरू येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र, सध्या ते राजस्थान येथील राजस्थान पुरातत्व आणि संग्रहालय विभागामध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे गावंडे यापूर्वी एका लाचप्रकरणामुळे चर्चेत आले होते.

लहान बहीण आएएस

टीना डाबी या स्वतः यूपीएससी टॉपर आहेत. विशेष म्हणजे त्यांची लहान बहीण रिया दाबी या सुद्धा आएएस अधिकारी आहेत. त्यांनी 2020 मध्ये यूपीएससी परीक्षेत 15 वा रँक मिळवला आहे. या यशानंतर आपल्या लहान बहिणीने आपला मान वाढवलाय. रियाने मिळवलेल्या यशाने मला खूप आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया टीना यांनी दिली होती. टीना आणि प्रदीप यांनी आपल्या लग्नाची घोषणा केलीय. लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.