IMD alerts Weather updates : मे महिन्यात ऊन की पाऊस, हवामान विभागाचा अंदाज काय?
IMD alerts Weather updates : एप्रिल व मे महिना पावसाचा गेला. आता मे महिना कसा असणार आहे, यासंदर्भातील पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. तसेच या महिन्यांत पाऊस कसा असणार त्याचाही अंदाज व्यक्त केलाय.
पुणे : मार्च आणि एप्रिल महिना पावसाचा होता. या दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता मे महिना कसा असणार याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे. राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातील उन्हाचा चांगलाच फटका बसला. परंतु एप्रिल संपत असताना तापमान ४० च्या आत स्थिर राहिले. आता मे महिन्यातही उष्णता जाणवणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व, ईशान्य आणि वायव्य भारत या भागात मे महिन्यातील तापमान ४० अंशांच्या पुढे असणार आहे. परंतु इतर भागात तापमान ४० अंशाच्या पुढे जाणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे.
काय आहे मे महिन्याचा अंदाज
राज्यभरात ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढत आहे. एप्रिल व मे महिना उन्हाळ्याचा असतो. परंतु यंदा मे महिन्यात ऊन कमी असणार आहे. पावसासंदर्भात भारतीय हवामान विभागाने मे महिन्याच्या अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये वायव्य भारतात, पश्चिम-मध्य भारताच्या अनेक भागांत मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस असणार असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यात गुरुवारी पावसाचा जोर पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे.
तापमानात घसरण
फेब्रुवारी महिन्यात शहराचा पारा 40 अंशांवर होते. त्यानंतर मार्च व एप्रिल महिन्यांत सतत पाऊस सुरू होता. परंतु त्यावेळी तापमानाने चाळीशी गाठली होती. आता मे महिना उजाडला तरी यंदा तापमान वाढले नाही. राज्यात सर्वाधिक तापमान ३६.६ अंश सांगलीचे होते. पण तापमान वाढले नसले तरी उकाडा जाणावत नाही. पुणे शहराचे तापमान अवघे 34 अंशांवर आहे. मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून वळवाच्या पावसाचे वेध लागतात. यामुळे कडक उन्हाळा यंदा जाणवणार नाही, असे म्हटले जाते. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे पुणे शहरावर ढगांची गर्दी होत आहे.
यवतामाळमध्ये पाऊस
यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. दारव्हा तालुक्यातील बोरी येथील अडाण नदीला पूर आल्याने वाहतूक खोळंबली. दारव्हा यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
भंडाऱ्यात पाऊस
भंडाऱ्यातील पालांदुरला वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. वीज खांब कोसळल्यानं विद्युत तारा लोंबकळल्यानं वीज पुरवठा खंडीत झाला. तसेच शेत पिकांचे मोठे नुकसान झाले.