IMD alerts Weather updates : मे महिना आला तरी उन्हाळा नाहीच, कुठे दिला यलो अलर्ट
IMD alerts Weather updates : मे महिना आला तरी ऊन्हाळा सुरु झालेला वाटत नाही. वातावरणात असा बदल कशामुळे झाला आहे. यासंदर्भात हवामान विभागाने धोक्याचा ईशारा दिला आहे. या सर्वांचा परिणाम शेतीवर होणार आहे.
पुणे : मे महिना चालू आहे, तारीख चार आली आहे. मुलांना ‘उन्हाळी सुट्टी’ लागली आहे. पण गेल्या तीन दिवसांपासून हवामानाचा एक वेगळाच प्रयोग सुरू आहे. यामुळे कुलर बंद आहेत. AC ची आठवण होत नाही, स्विमिंग पूलमध्ये गर्दी नाही. या सर्व गोष्टीना कारणही तसेच आहे. राज्यातील वातावरण गेल्या तीन दिवसांपासून बदलले आहे. उन्हाळा असताना अनेक शहरांचे तापमान ३५ अंशांच्या खाली आहे. पुणे, मुंबईत ३२ आणि ३३ अंश तापमान आहे. यामुळे मे महिन्यातील अंगाची लाहीलाही जाणवत नाही.
हवामान का बदलत आहे?
मे महिन्यात वातावरण सध्या थंड आहे. तुम्ही यासंदर्भात आनंद वाटत असेल पण ही फार आनंदाची बाब नाही. याबाबत हवामानतज्ज्ञ नेहमीच इशारे देत आले आहेत. कारण याचा परिणाम पिकांवर होत आहे. दुसरे दीर्घकालीन नुकसान म्हणजे अन्न संकटालाही सामोरे जावे लागते. गेल्या चार दिवसांपासून राज्याचे तापमान ३५ अंशांच्या खाली आहे.
मे महिन्यात जे हवामान बदलले आहे ते भौगोलिक परिस्थितीतील काही मोठ्या बदलांमुळे आहे. याचे कारण म्हणजे दोन प्रकारचे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. यापैकी हरियाणा आणि दक्षिण पाकिस्तानवर एक चक्रवाती परिवलन तयार झाले आहे आणि दुसरीकडे उत्तर-पश्चिम राजस्थानवरही एक चक्रवाती परिचलन कार्यरत आहे. त्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
मान्सूनवर अल निनोचा प्रभाव
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, मान्सूनवर अल निनोचा कोणताही प्रभाव नाही. ते म्हणाले होते, “अल निनोमुळे मान्सून चांगला होणार नाही, असे नाही. 1951 ते 2022 यामध्ये 15 वर्षे अल निनोचे होते. त्यापैकी सहा वर्षे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता.
राज्यात यलो अलर्ट
राज्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. पुणे शहरासह अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस मेगगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट दिला आहे.
राज्यात सर्वाधिक तापमान कुठे
राज्यात सर्वाधिक तापमान जळगावात ३६ अंश होते. मे महिन्यात जळगावातील तापमान ४१ ते ४३ अंशांवर असते. पुणे ३३.४ तर मुंबई ३२.७ अंशांवर तापमान होते.
हे ही वाचा IMD alerts Weather updates : मे महिन्यात ऊन की पाऊस, हवामान विभागाचा अंदाज काय?