सॅनिटायझर, पीपीई किट्स विक्रीच्या धंद्याचं अमिष दाखवून एक कोटीचा गंडा; मित्रांनीच केला मित्राचा घात
कोल्हापूरः कोल्हापूर (Kolhapur) शहरात व्यवसायातून (Business) फायदा (Profit) मिळवून देण्याचे अमिष दाखवून 1 कोटी 5 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात शाहूपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील याचा तपास करत आहेत. सॅनिटायझर, हँडग्लोज, पीपीई कीट, ऑक्झिमीटर, फेस शिल्ड आणि मास्क या वस्तूंच्या ऑर्डर घेऊ […]
कोल्हापूरः कोल्हापूर (Kolhapur) शहरात व्यवसायातून (Business) फायदा (Profit) मिळवून देण्याचे अमिष दाखवून 1 कोटी 5 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात शाहूपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील याचा तपास करत आहेत. सॅनिटायझर, हँडग्लोज, पीपीई कीट, ऑक्झिमीटर, फेस शिल्ड आणि मास्क या वस्तूंच्या ऑर्डर घेऊ आणि मोठा फायदा मिळवून देतो असं सांगून कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार संतोष मोहन पवार (राजारामपूरी, दौलतनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.
कोल्हापूर शहरातील टोल नाका, कावळा नाका ते तावडे हॉटेल या मार्गावर डायमंड मोटर्स नावाचा जुनी वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. डायमंड मोटर्स हा व्यवसाय संतोष मोहन पोवार यांचे व्यावसायिक सहकारी जिलानी मुल्ला, समीर भालदार यांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळेच फिर्यादीसह व्यावसायिक साथीदारांची ओळख झाली होती. व्यावसायिक साथीदार असल्याने त्यांनी विश्वास ठेऊन ही गुंतवणूक करण्यात आली.
ऑर्डर घेऊ, फायदा मिळवू
या प्रकरणातील संतोष पवार फिर्यादीला त्यांच्या व्यावसायिक साथीदारांनी सॅनिटायझर, हॅंडग्लोज, पीपीई कीट, ऑक्झिमीटर आणि फेसशिल्ड, मास्क अशा वस्तूंची ऑर्डर घेऊन आपण त्यातून मोठा व्यवसाय करूया असे सांगत त्यांना फायद्याचे आमिष दाखवण्यात आले. सध्या कोरोना काळ असल्याने या वस्तूंची विक्री, खरेदी नागरिकांकडून होत असते, त्यामुळे या सर्वांनी मिळून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यातून आतापर्यंत एक कोटी पाच लाख पंधरा हजार पाचशे रुपयांची गुंतवणूक एवढी रक्कम त्यांच्या साथीदारांनी संशयितांना दिली.
नवीन व्यवसाय करायचा म्हणून हे सगळे पैसे व्यवसायात न गुंतवता ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पवार यांच्यासह व्यावसायिक साथीदार असणाऱ्यांची फसवणूक केली.
संबंधित बातम्या