VIRAL VIDEO : घोडागाडी शर्यतीत गाडीवान घोड्यांच्या टापांखाली अक्षरश: तुडवला गेला, पळता पळता गेला तोल..

पळता पळता त्याचा तोल सुटल्याने तो थेट घोड्यांच्या टापाखाली येतो, आणि पाठीमागून येणारा घोड्यांचा गा़डाच पूर्ण त्याच्या अंगावरुन जातो, असा हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी असलेल्या गर्दीतूनही त्याला मदत करण्यासाठी पुढे येऊ शकत नाही. एका क्षणात घोडा आणि चाकं त्याला तुडवून पुढे जातात, असा हा व्हिडिओ आहे

VIRAL VIDEO : घोडागाडी शर्यतीत गाडीवान घोड्यांच्या टापांखाली अक्षरश: तुडवला गेला, पळता पळता गेला तोल..
horse cart accidentImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 9:16 PM

कोल्हापूरशर्यत म्हटले की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे थरारत्यामुळे राज्यातील बैलांच्या किंवा घोड्यांच्या शर्यतीत अनेक थरारक घटना पाहायला मिळतात. सध्या असाच एका घोडागाडी शर्यतीमधील (horse cart race) थरारक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यात एक गाडीवान घोड्यापुढून पळतो आहे. मात्र पळता पळता त्याचा तोल सुटल्याने तो थेट घोड्यांच्या टापाखाली येतो, आणि पाठीमागून येणारा घोड्यांचा गा़डाच पूर्ण त्याच्या अंगावरुन जातो, असा हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी असलेल्या गर्दीतूनही त्याला मदत करण्यासाठी पुढे येऊ शकत नाही. एका क्षणात घोडा आणि चाकं त्याला तुडवून पुढे जातात, (accident)असा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video)होतोय आणि चर्चेचा विषय ठरलाय. अशा शर्यतीत भाग घेण्याबरोबरच त्या ठिकाणी थोडी काळजीही घेण्याची गरज यानिमित्तानं समोर येते आहे.

काय आहे व्हिडिओत

व्हिडिओत गर्दीच्या ठिकाणी घोडागाडी शर्यत सुरु असल्याचे दिसते आहे. पुढे असलेला घोड्यांच्या पुढे धावणारा गाडीवान दिसतो आहे. घोडे इतके वेगात असतात, की हा गाडीवान त्यांच्या गतीत कमी पडतो, एका क्षणात या गाडीवानाचा तोल जातो आणि तो खाली पडतो. तेवढ्या एका क्षणार्धात घोडे आणि गाडा त्याच्या अंगावरुन जाताना दिसतो. बघ्यांची एवढी गर्दी असतानाही क्षणार्धात काय झालं, हेच त्यांना कळत नाही. काही कळायच्या आत, त्याला मदत मिळायच्या आतच हा सगळा अपघात घडताना या व्हिडिओत दिसतो आहे. घोडागाड्याचा वेगच इतका जबरदस्त होता की हा सगळा प्रकार घडल्यानंतरच मग धावाधाव सुरु झाल्याचे दिसते आहे. हा व्हिडीओ 15 दिवसांपूर्वीचा असून कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर असल्याचे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा

घोडागाडी, बैलगाडा शर्यतीत सावधगिरी गरजेची

घोडागाडी असो वा बैलगाडा, या शर्यतींवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटविल्यानंतर सध्या राज्यात शर्यतींचं पेव फुटलं आहे. सगळीकडेच बैलागाडा, घोडागाडी शर्यतींचं आयोजन करण्यात येतं आहे. अशा ठिकाणी बैलजोड्या आणि घोडे घेऊन येणारे शेतकरीही अत्यंत उत्साहात असतात. आपल्याच गाड्याला पहिला क्रमांक मिळावा, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु असतो. मात्र या आनंदाच्या स्पर्धेत थरारही आहे. कधीकधी हा थरार जीवावर बेतू शकतो, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे

अपघात रोखण्याची गरज

अनेकदा गावांच्या जत्रा आणि यात्रांमध्ये अशा प्रकारच्या शर्यतींचे आयोजन केले जाते. त्या शर्यती पाहायला गर्दीही मोठ्या प्रमाणात होते. अनेक ठिकाणी तर या शर्यतींत बैलं, घोडे उधळण्याचे प्रकारही घडतात. तसेच गाडा सुटल्यानंतर तो थांबवतानाही अपघाताचे प्रकार घडतात. अशा वेळी स्थानिक प्रशासन, पोलिसांनी या मार्गाकडे, असे प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याची गरज आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.