Kolhapur North Election Result 2022 : करुणा शर्मांनीही अखेर कोल्हापूर उत्तरमध्ये खातं उघडलं, दुसऱ्या फेरीत बाराचा फेरा, एकूण किती मिळवणार?

Kolhapur North Election Result 2022 : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत खरी लढत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि सत्यजित कदम यांच्यात सुरू आहे. मात्र, असं असलं तरी अपक्ष उमेदवार करुणा शर्मा यांनीही खातं खोलून राजकीय वर्तुळाचं लक्षा आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

Kolhapur North Election Result 2022 : करुणा शर्मांनीही अखेर कोल्हापूर उत्तरमध्ये खातं उघडलं, दुसऱ्या फेरीत बाराचा फेरा, एकूण किती मिळवणार?
करुणा शर्मांनीही अखेर कोल्हापूर उत्तरमध्ये खातं उघडलं, दुसऱ्या फेरीत बाराचा फेरा, एकूण किती मते मिळवणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 10:31 AM

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur North Election Result) खरी लढत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि सत्यजित कदम यांच्यात सुरू आहे. मतमोजणी सुरू झाल्यापासून जयश्री जाधव (jayshree jadhav) यांनी मोठी आघाडी घेतली आहे. जवळपास 9 हजार मतांची त्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जाधव यांच्या विजयाचे संकेत मिळत आहेत. तर कदम हे पिछाडीवर पडले आहेत. मात्र, असं असलं तरी अपक्ष उमेदवार करुणा शर्मा यांनीही खातं खोलून राजकीय वर्तुळाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. करूणा शर्मा (karuna sharma) यांना पाचव्या फेरीअखेर 28 मते मिळाली आहेत. करुणा शर्मा या स्वत: मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित आहेत. येणारी प्रत्येक निवडणूक लढणार असल्याचं करूणा शर्मा यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना एकूण किती मते मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच चुरस अधिक रंगली आहे. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात खऱ्या अर्थाने निवडणुकीची रंगत सुरू आहे. करूणा शर्मा यांनीही ही निवडणूक लढवल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. करूणा शर्मा या निवडणुकीत काय चमत्कार करतात आणि कोल्हापूरकर त्यांना साथ देतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शर्मा यांनाही प्रचाराचा धडाका उडवून दिला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांना अपेक्षित मते मिळताना दिसत नाहीये. पाचव्या फेरी अखेरीस त्यांना फक्त 28 मते मिळाली आहेत. त्यांच्यापेक्षा नोटाला अधिक मते मिळाली आहेत. नोटाला 341 मते मिळाली आहेत.

नवव्या फेरीतील चित्रं काय?

नव्या फेरीत जयश्री जाधव यांना 2744 मते मिळवली आहेत. तर कदम यांना 2937 मते मिळाली आहेत. या फेरीत कदम यांनी 193 मतांची लीड घेतली आहे. तर जयश्री जाधव यांना नवव्या फेरीअखेरीस एकूण 36 हजार 737 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या सत्यजित कदमांना 27778 मते मिळाली आहेत. जाधव यांनी 8959 मतांची लीड घेतली आहे. अजूनही 17 फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे या फेऱ्यांमध्ये कदम काही चमत्कार करतात की जाधव बाजी मारून जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

Kolhapur by Election Result 2022: कोल्हापूरच्या उत्तरच्या पहिल्या फेरीत काँग्रेसचं पारडं जड, जयश्री जाधव यांची दोन हजार मतांची आघाडी

Kolhapur उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल आज? कोण मारणार बाजी

Kolhapur Election Result 2022 : काही तासात निकाल हाती, उत्तर कोल्हापुरात “पंजा कसणार की कमळ” फुलणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.