प्रवाशी गाढ झोपेत होते, बस १०० फूट खोल दरीत कोसळली

Road Accident: जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बस अपघात झाला आहे. झोपेत असलेल्या प्रवाशांना काय झाले हे कळण्याच्या आत बस १०० खोल दरीत कोसळली. या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले आहे.

प्रवाशी गाढ झोपेत होते, बस १०० फूट खोल दरीत कोसळली
Road Accident
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 10:52 AM

इंदूर शहराकडून अकोल्याकडे येणाऱ्या खाजगी प्रवाशी बसचा शनिवारी अपघात झाला आहे. बसमधील प्रवाशी झोपेत असताना सकाळी पाच वाजता बस दरीत कोसळली. जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात हा बस अपघात झाला. झोपेत असलेल्या प्रवाशांना काय झाले हे कळण्याच्या आतच बस १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. जखमींवर दर्यापूर (मध्यप्रदेश ) तसेच बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य सुरू करण्यास उशीर झाला. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी स्थानिक लोकांनीही मदत केली.

घटनास्थळी नऊ रुग्णवाहिका

अपघातामधील जखमींना मदत कार्य सुरु करण्यासाठी घटनास्थळी नऊ रुग्णावाहिका दाखल झाल्या आहेत. अपघातात प्रवाशांच्या हात, पायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. बसमध्ये ४० ते ४५ प्रवाशी होते. ही बस रॉयल ट्रॅव्हल्सची होती. शाहापूर पोलीस ठाणे अंतर्गत हा  बस अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणाचा मृत्यू झाला नाही.

बस खराब झाली अन्….

इंदूरवरुन अकोल्याकडे जाणारी ही बस रस्त्यात नादुरुस्त झाली. गाडी दुरुस्त करण्यासाठी चालक खाली उतरला. त्या ठिकाणी उतार असल्यामुळे चालकाने टायरच्या खाली लाकडाचा अडथळा लावला होता. परंतु बसच्या टायर खाली  लावलेला हा अडथळा सरकला अन् बस उतारामुळे खाली दरीत कोसळली. या अपघातानंतर जखमींच्या मदतीसाठी आणि बसला दरीतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांनी मदत कार्य सुरु केले.

हे सुद्धा वाचा

काही लोक चालतच वर आले

बस दरीत कोसळल्यानंतर बसमध्ये झोपलेल्या प्रवाशांची आरडाओरड सुरु झाली होती. त्यावेळी बस खराब झाल्यामुळे बसमधील काही लोक खाली उतरले होते. त्यांनी दरीत धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. काही लोक स्वत: चालत रस्त्यावर आले. अपघाताची माहिती पोलीस कंट्रोल रुमला देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि रुग्णावाहिका दाखल झाल्या.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.