Krishna Prakash: “बाप्पाला तू शेवटच्या श्वासापर्यंत जवळ ठेवलंस, गणोशोत्सव येतोय अन् तू गेलीस” आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांची भावूक पोस्ट
कृष्ण प्रकाश यांच्या आईचं निधन झालं आहे. त्याबाबात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
मुंबई : आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) समाज माध्यमांवर चर्चेत असतात. त्यांच्या विविध पोस्टमुळे ते चर्चेत असतात. त्यांच्या पोस्ट अनेकांना प्रेरणा देतात. मात्र आता त्यांच्या पोस्टमुळे अनेकांना भावूक केलं आहे. कृष्ण प्रकाश यांच्या आईचं निधन (Krishna Prakash Mother) झालं आहे. त्याबाबात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आई, तुझी गणपती बाप्पावर अपार श्रद्धा होती. तू कायम तुझ्याजवळ बाप्पााची मूर्ती ठेवायचीस. तुझ्या शेवटच्या दिवसातही तू बाप्पाला जवळ ठेवलंस. आता गणपती काही दिवसांवर आले आहेत. अश्यात तू गेलीस. हे सगळं मला अपेक्षित नव्हतं. तुझ्याशिवाय मी काहीच नाही, असं कृष्णप्रकाश यांनी म्हटलंय.
।। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी !! कल संध्या 6.17 मिनट को हमने हमारी माँ खो दी और भिकारी हो गए! “A mother is with us always, first in her lifetime, then forever in our memory.” When we lose a loved one here on earth,we gain an angel in heaven that watches over us. ? pic.twitter.com/6c1LVrSbSJ
हे सुद्धा वाचा— Krishna Prakash (@Krishnapips) August 20, 2022
माझी आई गेली. तिच्या विना मी भिकारी आहे, असं कृष्ण प्रकाश यांनी म्हटलंय. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”, आईचं निधन झालं अन् मी पोरका झालो, भिकारी झालो, असं कृष्णप्रकाश म्हणाले. “आई नेहमी आपल्यासोबत असते, आधी आपल्या आयुष्यात, नंतर कायमची आपल्या आठवणीत राहाते जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावतो तेव्हा आपल्याला स्वर्गात एक देवदूत मिळतो जो आपल्यावर लक्ष ठेवतो. मी माझ्या आईला गमावलं आहे. याचं दुख्: मी शब्दात सांगू शकत नाही”, असं कृष्णप्रकाश आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
Thank you for all your messages of support in this difficult time. I still can’t believe that my dear mother has joined the angels above. Please pray for her soul and courage to my family to go through this immeasurable grief ? pic.twitter.com/Ju0FTnTIZZ
— Krishna Prakash (@Krishnapips) August 22, 2022
माझी माँ के बराबर कोई नहीं… या कठीण काळात मला अनेकांचे सांत्वनाचे फोन आले. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद… मला अजूनही विश्वास बसत नाही की माझी आई देवाघरी गेली यावर… तिच्यासाठी प्रार्थना करा आणि माझ्या कुटुंबाला या अपार दुःखातून जाण्यासाठी धैर्य मिळो, अशीही पोस्ट कृष्ण प्रकाश यांनी लिहिली आहे.