Accident | अक्कलकोटवरुन दर्शन घेऊन परतणारी गाडी घाटातून दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू

Jalgaon Accident | उत्तर महाराष्ट्रात २४ तासांत दोन मोठे अपघात झाले. नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात रविवारी संध्याकाळी अपघात झाला. त्यानंतर रविवारी रात्री दोन वाजता चाळीसगावमधील कन्नड घाटात भीषण अपघात झाला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला.

Accident |  अक्कलकोटवरुन दर्शन घेऊन परतणारी गाडी घाटातून दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू
jalgaon chalisgaon accident Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 8:46 AM

खेमचंद कुमावत, चाळीसगाव, जळगाव, दि. 27 नोव्हेंबर 2023 | उत्तर महाराष्ट्रात २४ तासांत दोन मोठे अपघात झाले. दोन्ही अपघात धार्मिक कार्यक्रमावरुन परत येत असताना झाले. नाशिकमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधील कन्नड घाटात अपघात झाला. रात्रीचा अंधार आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात सात जण जखमी झाले आहे. दोन्ही अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घाटात झालेला हा अपघात अत्यंत भीषण होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

कसा झाला अपघात

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या कन्नड घाटात रविवारी रात्री अपघात झाला. रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात झाला आहे. धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तवेरा गाडी दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच सात जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

धार्मिक कार्यक्रमास गेले अन्…

रविवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात रविवारी संध्याकाळी अपघात झाला. या अपघातात रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक हे पाचही तरुण ठार झाले. सर्व जण मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथील धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. त्यानंतर अक्कलकोट येथून दर्शन घेऊन येणाऱ्या तवेरा गाडीचा रविवारी रात्री दोन वाजता अपघात झाला. हे सर्व जण मालेगावकडे प्रवास करत होते. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहे. या जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

अपघातातील जखमी

  • अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी ,वय 20
  • जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी, वय 17
  • सिधेस पुरुषोत्तम पवार,वय 12
  • कृष्णा वासुदेव शिर्के, वय -4
  • रूपाली गणेश देशमुख,वय 30
  • पुष्पा पुरूषोत्तम पवार,वय -35
  • वाहन चालक – अभय पोपटराव जैन, वय 50

मृतांमध्ये आठ वर्षांची पूर्वा

  • प्रकाश गुलाबराव शिर्के,वय -65
  • शिलाबाई प्रकाश शिर्के,वय -60
  • वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी,वय -35
  • पूर्वा गणेश देशमुख, वय -08
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.