मंत्री गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका, ठोठवला दंड

Eknath Khadse and Gulabrao Patil : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना दंड झाला आहे. जळगाव जिल्हा न्यायालयाने एका खटल्यात गुलाबराव पाटील यांना दंड केला आहे. तसेच पुढील तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले.

मंत्री गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका, ठोठवला दंड
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 2:02 PM

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यांतील वाद जळगाव जिल्ह्यात नाही तर राज्यात चर्चेत असतो. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातात. एकनाथ खडसे यांनी एका प्रकरणात गुलाबराव पाटील यांच्यांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला. त्या प्रकरणात जळगाव जिल्हा न्यायालयाने गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड केला आहे.

काय आहे प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या खटल्यात सुनावणी जळगाव जिल्हा न्यायालयात सुरु आहे. पहिल्याच दिवशी मंत्री गुलाबराव पाटील गैरहजर होते. गुलाबराव पाटील यांनी आपल्या वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला होता. कोर्टाने 500 रुपयांचा दंड करत गुलाबरावांचा अर्ज मंजूर केला. तसेच रजेचा अर्ज मंजूर करताना, उद्याचा सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, अशी तंबीही दिली, अशी माहिती एकनाथ खडसे यांचे वकील भूषण देव यांनी दिली.

कधी होणार पुढची सुनावणी

जळगाव जिल्ह्यातील या बहुचर्चित खटल्याची पुढील सुनावणी 21 जून रोजी ठेवली आहे. युती सरकारमध्ये खडसे बारा खात्यांचे मंत्री असताना गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकारकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटण्याचा आरोप केला होता. या आरोपासंदर्भात एकनाथ खडसे यांनी 2016 मध्ये गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या खटल्याची आता नव्याने सुनावणी सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

या खटल्याची सुनावणी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयातील अतिEknath Khadse and क्त न्यायदंडाधिकारी प्रितम नायगावकर यांच्या कोर्टात सुरू आहे.Eknath Khadse and एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीचे साथ धरली. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन अन् गुलाबराव पाटील खडसे यांच्यांवर टीकेची एकही संधी शोधत नाही. तिन्ही नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु असतात. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात या तिन्ही नेत्यांच्या वक्तव्यांची नेहमीच चर्चा असते.

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.