AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्रात पुन्हा अनपेक्षित राजकीय भूकंप होणार’, गिरीश महाजनांचा सर्वात मोठा दावा

जळगावातील काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी कारवाई केली. नाना पटोले यांनी उल्हास पाटील यांना 6 वर्षांसाठी निलंबित केलं. त्यानंतर आता उल्हास पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. या विषयावर बोलताना गिरीश महाजन यांनी सर्वात मोठं भाकीत वर्तवलं आहे.

'महाराष्ट्रात पुन्हा अनपेक्षित राजकीय भूकंप होणार', गिरीश महाजनांचा सर्वात मोठा दावा
| Updated on: Jan 23, 2024 | 5:05 PM
Share

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 23 जानेवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठमोठे भूकंप घडणार असल्याचं भाकीत भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन वर्तवत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला तेव्हा गिरीश महाजन यांनी आगामी काळात राजकारणात मोठे भूकंप घडणार असल्याचं भाकीत वर्तवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी तसेच संकेत वर्तवले आहेत. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. कारण जळगावमधील काँग्रेसचे प्रसिद्ध नेते आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याविरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर आता उल्हास पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. उल्हास पाटील यांचा उद्या बुधवारी मुंबईत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल, अशी चर्चा सुरु आहे. उल्हास पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर उत्तर देताना गिरीश महाजन यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे.

“उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल माहिती नाही. हा भूकंप कसा होतो ते माहीत नाही. मात्र मी बोललो होतो त्या पद्धतीने सर्वात मोठे भूकंप म्हणजे तुम्हाला अपेक्षित नसतील असे मोठे राजकीय भूकंप हे पुन्हा महाराष्ट्रात होणार आहेत”, असे सूचक संकेत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. गिरीश महाजन यांनी याआधीही तसे संकेत दिले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसावा तशा घटनाही घडल्या आहेत. सर्वात पहिली घटना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड पुकारुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली, दुसरी घटना म्हणजे सत्तांतरानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात 40 आमदारांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला.

गिरीश महाजन यांचं भाकीत खरं ठरणार?

राज्यातील दोन विरोधी पक्षांत मोठी फूट पडली आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षातही मोठी फूट पडेल, अशा चर्चा सातत्याने होत आहेत, किंवा तशा चर्चा मुद्दामून राजकीय वर्तुळात घडवून आणल्या जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होणार, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. या दरम्यानच्या काळात काही काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची देखील भाजपात जाणार असल्याची चर्चा समोर आली. पण त्या नेत्यांनी संबंधित दावे तात्काळ फेटाळले आहेत. तरीदेखील उल्हास पाटील सारख्या दिग्गज नेत्यांनं भाजपात जाणं हे काँग्रेसला जळगावात मोठं खिंडार पडण्यासारखंच आहे. त्यामुळे आगामी काळात गिरीश महाजन यांचं भाकीत खरं ठरतं की काँग्रेस एकसंघ राहण्यात यशस्वी होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.

(हेही वाचा : महाराष्ट्र काँग्रेसमधील खळबळजनक बातमी, बडा नेता तडकाफडकी निलंबित, भाजपात प्रवेशाच्या चर्चांना उधाण)

जळगावातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानावर तब्बल 15 हजार स्क्वेअर फुट जागेवर प्रभू श्री रामचंद्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली. या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली होती. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याचं भाकीत वर्तवलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.