Car Accident| टायर फुटून कार टँकरवर आदळली; दीड वर्षाच्या नातीसह आजीने सोडले प्राण

भुसावळमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. यावेळी खडका चौफुलजवळील अपघातस्थळी नागरिकांनी तुफान गर्दी केली. त्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या.

Car Accident| टायर फुटून कार टँकरवर आदळली; दीड वर्षाच्या नातीसह आजीने सोडले प्राण
Car accident, Bhusawal
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 12:14 PM

जळगावः जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये साठ वर्षांच्या आजीसह दीड वर्षाच्या नातीचा मृत्यू झाला. या घटनेत कारमधील पती-पत्नी आणि ड्रायव्हर जखमी झालेत. हा अपघात इतका भीषण होता की, टायर फुटल्याने कार रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरवर जावून आदळली. त्यामुळे ती चक्काचूर झाली.

अतिशय भीषण दृश्य

छत्तीसगढमधील रायपूरचे दीपकसिंग आलुवालिया हे पत्नी गुंजन, दीड वर्षाची मुलगी बानी आणि आई सुरजिंदरकौर यांना घेऊन कल्याणला चालले होते. सोबत ड्रायव्हर दीपकसिंह होता. मात्र, कारचे (सी.जी. 04 डी.एफ.5047) मागचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी थेट तिथे उभ्या असलेल्या टँकरवर आदळली. यात दीपकसिंग यांची दीड वर्षांची मुलगी आणि आई सुरजिंदर कौर यांचा मृत्यू झाला. घटनेत दीपकसिंग आणि त्यांची पत्नी गुंजन, ड्रायव्हर जखमी झाला आहे.

प्रयत्न निष्फळ

अपघातानंतर जखमींना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात आले. तर दीड वर्षाच्या बानीला नागरिकांनी चौफुलीजवळील लहान मुलांच्या रुग्णालयात नेले. तिथून तिला दुसरीकडे नेण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर रात्री जळगावला या चिमुकलीला हलवण्यात आले. तिच्या उपाचारासाठी खूप जीव तोडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, तिचे प्राण वाचू शकले नाहीत. या घटनेमुळे अनेक वेळ वाहतूक कोंडी झाली. शेवटी शहर पोलिसांनी येऊन वाहतूक नियंत्रित केली.

बघ्यांची तोबा गर्दी

भुसावळमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. यावेळी खडका चौफुलजवळील अपघातस्थळी नागरिकांनी तुफान गर्दी केली. त्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. शेवटी पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत लोकांना हटवले. अपघातग्रस्त वाहन दुसरीकडे नेण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.

वेगावर ठेवा नियंत्रण

भुसावळजवळील अपघाताचे कारण काहीही असो. मात्र, नागरिकांनी आपल्या वाहनावर जरूर नियंत्रण ठेवावे. तुम्ही कोणतेही वाहन चालवत असा. मग ती दुचाकी असो की, चारचाकी. वाहनाचा वेग जर मर्यादित ठेवला, तर अपघात नक्कीच टाळता येतो. अनेकांचे नाहक जाणारे प्राण वाचू शकतात. त्यासाठी फक्त थोडे जागरूक रहावे लागेल इतकेच.

इतर बातम्याः

Property Tax|नाशिकमध्येही मालमत्ता करमाफी होण्याची शक्यता; पालकमंत्री छगन भुजबळांनी काय दिले संकेत?

Nashik|मालेगावमध्ये कोरोना लसीकरण नोंदणीत घोळ, चौकशीपूर्वीच 10 शिक्षकांचे निलंबन रद्द

Malegaon scam| कृषिमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यात 89 कोटींचा अनुदान वाटप घोटाळा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.